कोट्यवधी खर्चून बांधलेला ठाण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव २ वर्षांपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:46 IST2026-04-06T11:45:54+5:302026-04-06T11:46:11+5:30

मुंब्रा येथील जलतरण तलावात शेवाळ, बेकायदा कृत्ये सुरू असल्याची नागरिकांची तक्रार

International standard swimming pool in Thane, built at a cost of crores, has been closed for 2 years | कोट्यवधी खर्चून बांधलेला ठाण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव २ वर्षांपासून बंद

कोट्यवधी खर्चून बांधलेला ठाण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव २ वर्षांपासून बंद

अजित मांडके/कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे/मुंब्रा: ठाण्यातील मुंब्रा भागातील मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या आणि दोन वर्षांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावात शेवाळ जमा होऊन पाणी हिरवे झाले आहेत. जलतरण तलावाचे प्रमुख प्रवेशद्वार कायम उघडे असते. त्यामुळे येथे बेकायदा कृत्ये सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने येथे भेट दिली असता, ‘आओ जाओ... घर तुम्हारा’, अशी स्थिती असल्याचे दिसले.
चेजिंग रूममधील उघडे लॉकर... कार्यालयातील निखळलेली पीओपी... पंखे, बल्ब गायब... तलावाच्या आजूबाजूला उखडलेल्या फरशा... हे दृश्य पाहिल्यानंतर हाच का तो कोट्यवधी रुपये खर्च केलेला आणि उद्घाटनावेळी चकाचक दिसणारा तलाव?, असा प्रश्न पडतो.

मुंब्रा भागातील जलतरण तलाव बंद झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. तो लवकरात लवकर सुरू करावा.
-आलीम शेख, नागरिक, मुंब्रा

घोडबंदर भागात चार नवीन तलाव

घोडबंदर भागात दोन जलतरण तलावांचे काम पूर्ण होत आले आहे. आणखी दोन जलतरण तलाव करण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारकडून पहिल्या टप्प्यात २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ७५ टक्के निधी सरकारचा असेल.

या ठिकाणी चांगल्या सुविधा

गडकरी रंगायतनच्या शेजारी सर्वात जुना जलतरण तलाव आहे. त्याचा फिल्टरेशन प्लॅंट बदलला आहे. त्यामुळे पोहण्यासाठी येण्याची चांगली व्यवस्था झाली आहे, अशी माहिती प्रशिक्षक कैलास आखाडे यांनी दिली. येथे लॉकर सुविधा, चेंजिग रूम, वॉश रूम उत्तम असल्याचे दिसून आले. बाळकुम येथील जलतरण तलाव खासगी संस्थेला चालविण्यासाठी दिला आहे. तेथे आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे पाणी बदलले जाते. येथील फिल्टरेशन प्लॅंट योग्य पद्धतीने सुरू आहे. वर्तकनगर येथील जलतरण तलावाच्या ठिकाणीही चांगल्या सुविधा असल्याचे दिसून आले.

महापालिका दोन जलतरण तलाव चालविते. कळवा भागात असलेल्या तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मुंब्रा येथील तलाव दोन वर्षांपासून बंद आहे. तेथील प्लॅंटदेखील बंद आहे. त्याची दुरुस्ती जो करेल, त्याला तो चालविण्यासाठी दिला जाईल.
-मीनल पालांडे, उपायुक्त, ठाणे पालिका

Web Title : ठाणे का करोड़ों का अंतरराष्ट्रीय स्विमिंग पूल दो साल से बंद

Web Summary : ठाणे में करोड़ों की लागत से बना अंतरराष्ट्रीय स्तर का स्विमिंग पूल मुंब्रा में दो साल से बंद है और अब शैवाल से भर गया है। स्थानीय लोगों ने खुले प्रवेश के कारण अवैध गतिविधियों की सूचना दी है। ठाणे के अन्य स्विमिंग पूल अच्छी तरह से बनाए हुए हैं, जबकि मुंब्रा का मरम्मत और एक नए संचालक का इंतजार कर रहा है।

Web Title : Thane's Costly International Swimming Pool Shut for Two Years

Web Summary : Thane's expensively built international swimming pool in Mumbra remains closed for two years, now filled with algae. Locals report illegal activities due to the open access. Other Thane swimming pools are well-maintained, while Mumbra's awaits repairs and a new operator, according to the Thane Municipal Corporation.

टॅग्स :Swimmingपोहणे