शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

माजी सैनिकांच्या आरोग्य योजनेच्या जागेसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे तहसिलदारांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 7:59 PM

ठाणे : ध्वज दिन निधी संकलनाकडे आपण एरव्हीच्या एखाद्या उद्दिष्ट्यपूर्ती मोहिमेसारखे पाहू नये तर अधिकाधिक निधी संकलित करावा असे ...

ठळक मुद्दे* सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ;मागील वर्षी दीड कोटींचा निधी संकलीतध्वजदिन निधीसाठी गेल्या वर्षभरात एक कोटी ८४ लाख इतके उद्दिष्ट्य होते

ठाणे : ध्वज दिन निधी संकलनाकडे आपण एरव्हीच्या एखाद्या उद्दिष्ट्यपूर्ती मोहिमेसारखे पाहू नये तर अधिकाधिक निधी संकलित करावा असे आवाहन करून माजी सैनिकांच्या आरोग्य योजनेबाबत लागणाऱ्यां  जागेचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ठाणे तहसीलदार यांना निर्देश दिले आहेत, असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीवेळी स्पष्ट केले. या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.तसे निर्देशयेथील जिल्हा नियोजनभवनमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन २०१८ चा शुभारंभ कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. आपले सैनिक सीमेवर खडा पहारा देत असल्यामुळे आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन निधी संकलन होय. सैनिकांविषयी कृतज्ञतेच्या भावनेतून ध्वज दिन निधी संकलन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम प्राणाची आहुती देणाऱ्यां  शूरवीर जवानांच्या स्मृतीला वंदन करण्यात आले. वीर माता व वीर पत्नींचाही यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. तर महाराष्ट्रातील १०८ शौर्य सन्मान प्राप्त सैनिकांच्या शौर्यगाथा शब्दबध्द केलेल्या ‘महारथी’ या पुस्तकाचे प्रकाशन विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांची उपस्थिती होती.ध्वजदिन निधीसाठी गेल्या वर्षभरात एक कोटी ८४ लाख इतके उद्दिष्ट्य होते, त्यापैकीपैकी ८५ टक्के म्हणजे एक कोटी ५८ लाखांचा निधी संकलित करण्यास यश मिळाले. यासाठी उत्तम कामगिरी केलेले ठाणे येथील उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी तसेच इतर अधिकाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन संन्मानीत करण्यात आले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजळ जाधव यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले. महारथी या पुस्तकातील शौर्यगाथा प्रत्यक्ष अनुभवांवर आधारीत असल्याने वाचकांना खूपच प्रेरणादायी ठरतील आणि देशासाठी लढणाऱ्यां  सैनिकांप्रती आपला आदर अधिक वाढेल, तसेच भारतीय सैन्य दल देश संरक्षणासाठी आपल्या जीवाची कशी बाजी लावते ते कळेल, असे या पुस्तकाचे लेखक दिलीप गुप्ते यांनी यावेळी सांगितले..........

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी