शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

‘७११’मधील वाढीव बांधकामांवर कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:22 PM

तक्रारदारांची माहिती : सीआरझेड, अतिउच्च दाबाच्या केबलखालील बांधकामावर पडणार हातोडा

मीरा रोड : माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीने उभारलेल्या ७११ क्लबने सीआरझेड व अन्य मंजूर परवानगीपेक्षा अतिरिक्त केलेल्या बांधकामावर कारवाई करण्याबाबतचे पत्र स्थानिक महापालिका प्रभाग अधिकारी यांना दिले आहे. 

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, मीरारोडच्या कनकिया भागात कांदळवनाचा ऱ्हास करून तसेच कांदळवनापासून ५० मीटर संरक्षित क्षेत्रात, सीआरझेड, पाणथळ, उच्चतम भरती रेषा  व नाविकास क्षेत्रात बेकायदेशीर भराव करून ७११ हॉटेल्स कंपनीने ७११ क्लब विकसित केला आहे. कांदळवनाचा ऱ्हास केल्याबद्दल मेहता यांचा भाऊ विनोद, सहकारी प्रशांत केळुस्कर व मेहुणा राज सिंह आदींवर महसूल विभागाने अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. पालिकेने एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय मेहतांसह पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवरही गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास आता मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

मेहतांनी पदाचा गैरवापर करून विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून नियमबाह्य बांधकाम परवानग्या मिळविल्या.  येथे कोणताच राज्य वा राष्ट्रीय महामार्ग नसताना महामार्गालगत तारांकित हॉटेलसाठी मिळत असलेल्या एक चटईक्षेत्राचा लाभ मिळविला, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. मीरा भाईंदरसह मुंबई उपनगर भागात वीजपुरवठा करणाऱ्या  २२० केव्ही या अतिउच्च दाबाच्या  केबल व टॉवरखाली बांधकाम करून निर्देशांचे उल्लंघन केले, असेही तक्रारीत नमूद केले आहे. 

पालिका व शासनाने आपणास सर्व परवानग्या दिल्या असून कांदळवनाचा ऱ्हास केलेला नाही, असा दावा मेहता व ७११ हॉटेल्स कंपनीकडून केला जात आहे. परंतु, आता स्वतः पालिकेनेच प्रभाग समिती क्रमांक चारच्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांना पत्र व नकाशा देऊन कळविले आहे की, नगररचनाकार दिलीप घेवारे यांनीच प्रभाग अधिकारी यांना पत्र देऊन नकाशात दर्शविलेले सीआरझेड, अतिउच्च दाबाच्या वीजवाहक केबल व टॉवरखाली केलेले तसेच अन्यत्र केलेले वाढीव बेकायदेशीर बांधकाम अनधिकृत असल्याने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे कळविले आहे. ही माहिती तक्रारदार अमोल रकवि, राजू गोयल, ब्रिजेश शर्मा, प्रदीप जंगम, कृष्णा गुप्ता, रोहित सुवर्णा आदींनी दिली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केला आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर