शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरऐवजी मीरारोड येथील राखीव भूखंडावर आगरी भवन बांधा; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 21:47 IST

पुर्वेकडील आझादनगर येथील राखीव भूखंडावर प्रस्तावित आगरी भवनासाठी पुरेशी जागा नसल्याने ते मीरारोड येथील सेव्हन ईलेव्हन हॉस्पिटलच्या मागील राखीव भूखंडावर पुरेशा जागेत बांधा

भार्इंदर : पुर्वेकडील आझादनगर येथील राखीव भूखंडावर प्रस्तावित आगरी भवनासाठी पुरेशी जागा नसल्याने ते मीरारोड येथील सेव्हन ईलेव्हन हॉस्पिटलच्या मागील राखीव भूखंडावर पुरेशा जागेत बांधा, अश्या सूचना  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनात गुरुवारी आयोजित बैठकीत पालिका आयुक्त बळीराम पवार यांना केली. 

यावेळी मीरा-भाईंदरमधील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. पालिकेने शहर विकास आराखड्यानुसार आझादनगर येथील राखीव भूखंडावर सामाजिक वनीकरण व उद्यानाचे आरक्षण क्रमांक १२२ टाकले आहे. त्याचा विकास पालिकेने अद्याप केलेला नाही. परिणामी त्या जागेवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अशातच त्यावर स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व संग्रहालय साकारण्याचा प्रस्ताव गतवर्षीच्या महासभेत मंजुर करण्यात आला. या भूखंडाच्या एकुण ४६ हजार ७०० चौरस मीटर जागेपैकी ३५ हजार १८२ चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा सत्ताधा-यांकडून तर ३० हजार ५३३ चौमी जागाच ताब्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. एकुण जागेपैकी ४ हजार ५८० चौरस मीटर जागेवर बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी यंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रकात ३ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. मात्र भाजपा सत्ताधा-यांनी त्यावर आगरी भवन निर्मितीच्या प्रस्तावाला २६ फेब्रुवारीच्या महासभेत मान्यता दिली. यामुळे एकाच आरक्षणावर तीन विकासकामे प्रस्तावित करण्यात आल्याने त्यांचा विकास प्रशासन राजकीय कुरघोडीतून कसा काय साधणार, असा प्रश्न सध्या चर्चिला जाऊ लागला आहे. तत्पुर्वी ही विकासकामे साधण्यापूर्वी त्या भूखंडावरील आरक्षणात राज्य सरकारच्या मान्यतेने फेरबदल होणे आवश्यक आहे. त्याचा प्रस्ताव २९ जूलै २०११ रोजीच्या महासभेत मंजुर करण्यात येऊन राज्य सरकारकडे २८ मार्च २०१२ रोजी मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने अमान्य केल्याने या भूखंडाऐवजी मीरारोड येथील सर्व समावेशक आरक्षण क्रमांक २४६ वरील २ एकर जागेत आगरी भवनची निर्मिती करावी, अशी सुचना पालकमंत्र्यांनी आयोजित बैठकीत पालिका आयुक्तांना केली. या आरक्षणातील सुमारे ७० टक्के जागा पालिकेच्या ताब्यात आल्याने त्यावर आगरी भवन सहज साकारता येणार असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, आझादनगर येथील उपलब्ध जागेच्या १५ टक्के जागेवरच स्मारक बांधकामाची परवागनी असताना त्याच जागेवर आगरी भवन बांधण्याचा भाजपा सत्ताधा-यांचा अट्टहास त्या समाजाची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप आ. प्रताप सरनाईक यांनी केला आहे. त्याची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी थेट पालकमंत्र्यांनाच साकडे घातल्याने गुरुवारी पालकमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. तसेच स्थानिक नगरसेविका नीलम ढवण यांच्या प्रयत्नाने भार्इंदर पुर्वेलाच सुरु असलेले मार्केटचे काम काही राजकीय मंडळीमार्फत थांबविण्याचा प्रयत्न होत असल्याने ते काम न थांबविण्याच्या सूचना देखील आयुक्तांना करण्यात आल्या. बैठकीत आ.  सरनाईक यांच्यासह पालिका आयुक्त, शहरअभियंता शिवाजी बारकुंड, नगररचनाकार हेमंत ठाकूर, सह नगररचनाकार केशव शिंदे, उपअभियंता नितीन मुकणे, कनिष्ठ अभियंता, श्रीकृष्ण मोहिते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक