शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

कारवाईऐवजी प्रशासनाने मागवल्या चक्क निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:54 AM

नियमांचे उल्लंघन करत लावले होर्डिंग

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने जाहिरात फलक नियंत्रण नियम २००३ धाब्यावर बसवले असतानाच आता पालिकेने पुन्हा ९५ होर्डिंग्जवर जाहिराती लावण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. मुळात नियमांचे पालन न करताच पालिकेने निविदा मागवल्याने अर्थपूर्ण हितसंबंधांच्या आरोपांना बळ मिळाले आहे. अपघाताला कारणीभूत व नियमांच्या उल्लंघनासह कांदळवन ºहासाचे दाखल गुन्हे, मंजुरीपेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग्ज, रस्ते-पदपथावर उभारलेल्या होर्डिंग्जप्रकरणी महापालिका भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकली आहे.महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी १७३ होर्डिंग्ज उभारले असून त्यावर जाहिरातींसाठी कंत्राटदार नेमले आहेत. सरस्वती आणि आदित्य अ‍ॅडव्हर्टायझिंग असे दोन कंत्राटदार असून त्यांना पालिकेने सातत्याने मुदतवाढ दिली आहे. शिवाय, पालिकेने खाजगी जमिनीवर ८३ होर्डिंग्जना परवानगी दिली आहे. परंतु, पालिकेने हे होर्डिंग उभारणी व परवानगी देताना जाहिरात फलक नियंत्रण अधिनियम पुरते धाब्यावर बसवले आहेत. कंत्राटदाराचे हित जोपासताना याआड पालिकेने राजकीय आणि आर्थिक हितही जोपासले आहे.नियमानुसार जाहिरात फलकांना मंजुरी तसेच त्याच्या नूतनीकरणाची कार्यवाही करताना फलकांचा आकार जास्तीतजास्त ४० फूट बाय २० फूट इतकाच ठेवणे बंधनकारक आहे. भोगवटा दाखला असलेल्या इमारतीच्या गच्चीवर जास्तीतजास्त ६० फूट बाय २० फूट इतक्याच आकाराच्या फलकास परवानगी दिली गेली पाहिजे. रस्त्याजवळ तसेच पदपथावर फलक उभारता येत नाहीत. त्यापासून दीड मीटरपर्यंत होर्डिंग लावता येत नाही. भरतीरेषेच्या परिसरातही मनाई आहे.असे असताना महापालिकेने शहरात सर्रास पदपथ व रस्त्यांवर होर्डिंग उभारले आहेत. घोडबंदर महामार्गावरील तीव्र वळणांवर महाकाय होर्डिंग लावले आहेत. चालकांचे लक्ष विचलित होणे व सतत होणाऱ्या अपघातप्रकरणी वाहतूक पोलिसांनी पत्रे देऊनही पालिकेने कारवाई केलेली नाही.चेणे-वरसावे भागात तर कांदळवन क्षेत्रात पालिकेने होर्डिंगना परवानगी दिली आहे. जास्तीतजास्त ४० बाय २० फूट आकार नियमात असतानाही पालिकेने त्यापेक्षा जास्त आकाराने परवानगी दिली आहे. इतकेच नव्हे तर दोन वा तीन परवानगी एकत्र करून महाकाय होर्डिंग उभारण्यात आले आहेत.पुणे होर्डिंग दुघर्टनेत नागरिकांचे बळी गेल्यानंतर तर मुंबई उच्च न्यायालयानेही संबंधितांना काटेकोर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र, महापालिकेसह जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने सातत्याने आश्वासनेच देत कार्यवाहीकडे डोळेझाक चालवली आहे. त्यातच आता पालिकेने १० बाय २० फुटांच्या ९५ होर्डिंगवर जाहिरातीसाठी निविदा मागवल्या आहेत.या निविदा भरण्याची अंतिम मुदत ४ डिसेंबर आहे. पालिकाच या घोटाळ्यात सहभागी असल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप तक्रारदार सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता, मनसेच्या अनू पाटील, भारिपचे सुनील भगत आदींनी केला आहे.नोटिसा बजावणे सुरुपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. विभागप्रमुख दिलीप जगदाळे यांनी मात्र खाजगी होर्डिंगधारकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून नियमातील तरतुदीप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक