वरसावे नाका परिसरातील हॉटेल कर्मचाऱ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:46+5:302021-02-23T04:59:46+5:30

मीरा रोड : मुंबई-अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर महामार्गाच्या वरसावे नाक्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये २१ कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आता महापालिका ...

Inspection of hotel staff in Varsave Naka area | वरसावे नाका परिसरातील हॉटेल कर्मचाऱ्यांची तपासणी

वरसावे नाका परिसरातील हॉटेल कर्मचाऱ्यांची तपासणी

Next

मीरा रोड : मुंबई-अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर महामार्गाच्या वरसावे नाक्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये २१ कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आता महापालिका खडबडून जागी झाली असून रविवारी या भागातील अन्य हॉटेलातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली. यात सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोना रुग्णांचे प्रमाण मध्यंतरी कमी झाले म्हणून संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालण्यापासून अनेक निर्देशांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. उल्लंघन होत असताना महापालिका, पोलिसांसह नगरसेवक, राजकारणीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागले आहेत. अनेक नगरसेवक, राजकारणी तर स्वत:ही मास्क घालत नाहीत. त्यातूनच, कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. वरसावे नाक्यावरील एक्स्प्रेस इन हॉटेलला पालिकेने कोरोना रुग्ण आढळल्याने ४ मार्चपर्यंत सील ठोकले. हॉटेलातील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

या परिसरातील हॉटेलांमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी महापालिकेने केली. प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हॉटेल सी.एन. रॉक, फाउंटन, शेल्टर आदी काही हॉटेल व आस्थापनांमधील २३१ जणांची ॲण्टीजेन चाचणी केली असता त्यातील ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. तर, २२५ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली. जे हॉटेल व लॉज नियमांचे पालन करणार नाहीत, अशा हॉटेलचालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करून हॉटेल सील करण्यात येणार आहे, असे प्रभाग अधिकारी सावंत यांनी सांगितले.

Web Title: Inspection of hotel staff in Varsave Naka area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.