ठाण्यात घरात शिरकाव करून तरुणीचा विनयभंग, रोमिओला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:58 IST2018-02-17T19:55:55+5:302018-02-17T19:58:45+5:30

ठाण्यात घरात शिरकाव करून तरुणीचा विनयभंग, रोमिओला अटक
ठाणे : घरात शिरकाव करून तरुणीचा विनयभंग करणा-या रोमिओला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. विनोद रंगा रावल (२१) असे त्याचे नाव असून तो वागळे इस्टेट रोड २७ येथील नेपाली चाळीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट येथे राहणा-या वीसवर्षीय तरुणीला कॉलेजला जाताना तो वारंवार रस्त्यात अडवून रिलेशन ठेवण्याची मागणी करत होता. मात्र, या गोष्टीला तिने त्याला नकार देऊनसुद्धा तो पाठलाग करून तिला दुचाकीवर बसण्याची मागणी करत होता. १६ फेब्रुवारीला त्याने तिच्या घराबाहेर तिचे नाव घेऊन जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली होती. तेव्हा आईवडिलांना नाव सांगेल, असे सांगून ती घरात गेली. दरम्यान, तिच्यापाठोपाठ घरात त्याने शिरकाव करून त्याने तिचा विनयभंग केला. तसेच तिला मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी तिला सोडवण्यासाठी आलेल्या महिलेसदेखील त्याने शिवीगाळ केली. प्रकरणी त्या पीडित तरुणीने शुक्रवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला तत्काळ अटक केली. याप्रकरणी पुढील पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण करत आहेत.