शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयामध्ये दाद मागा

By admin | Updated: December 25, 2016 04:26 IST

अंबरनाथमधील दी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील काही शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

अंबरनाथ : अंबरनाथमधील दी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील काही शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र, उपोषणाचा मार्ग अवलंबून प्रश्न सुटणारा नाही. शिक्षकांनी न्यायालयात आपली बाजू मांडावी. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका दी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर आणि कार्यवाह सुहास आठल्ये यांनी घेतली आहे. दी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील शिक्षिका सुलोचना वीर, नयना गुळीक, संगीता चव्हाण, दीपा सुर्वे, मीना शिंदे या पाच शिक्षिका आणि पुष्पा सातपुते या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अशोक मिसाळ यांनी उपोषणकर्ते शिक्षक आणि शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांना २२ डिसेंबरला कार्यालयात चर्चेसाठी बोलावून समेट घडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी सरकार या प्रकरणी जो निर्णय देईल, तसेच न्यायव्यवस्था जो आदेश देईल, त्याला शिक्षण संस्था बांधील असेल, असे स्पष्ट केले होते. मात्र, तरीही शिक्षकांनी आपले उपोषण मागे न घेतल्याने पाटगावकर यांनी संस्थेची बाजू मांडताना शिक्षिका दीपा सुर्वे आणि मीना शिंदे यांना पर्यवेक्षकपदी पदोन्नती या चुकीच्या सेवाज्येष्ठता यादीच्या आधारे दिली गेली होती. ही सेवाज्येष्ठता यादीच रद्द झाल्याने त्यांची पदोन्नतीसुद्धा रद्द झाल्याची माहिती संस्थेने दिली आहे. तसे या प्रकरणात शिक्षिकांनी शाळा न्यायाधीकरण यांच्याकडे दाद मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुलोचना वीर, नयना गुळीक आणि संगीता चव्हाण या तीन शिक्षिकांनी शाळा न्यायाधीकरण यांच्याकडे दाखल केलेल्या विविध याचिका न्याय यंत्रणेने फेटाळल्या असल्याचे कार्यवाह आठल्ये यांनी सांगितले. पुष्पा सातपुते या शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अनुकंपातत्त्वावर डिसेंबर २०१६ पासून कामावर रुजू करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी संस्था आणि शिक्षकांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी अन्य शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)