राहुल गांधींच्या समर्थनार्थ भिवंडीत युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन

By नितीन पंडित | Updated: March 25, 2023 17:01 IST2023-03-25T17:01:15+5:302023-03-25T17:01:32+5:30

अभिनव आंदोलन करीत या निर्णयास विरोध दर्शवित राहुल गांधी यांना समर्थन दिले आहे.

Innovative movement of Youth Congress in Bhiwandi in support of Rahul Gandhi | राहुल गांधींच्या समर्थनार्थ भिवंडीत युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन

राहुल गांधींच्या समर्थनार्थ भिवंडीत युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन

भिवंडी : राहुल गांधी यांच्या वक्तव्या विरोधात सुरत येथील न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्या नंतर राहुल गांधी यांची खासदारकी सुध्दा रद्द करण्यात आली आहे.या कारवाईने संपूर्ण भारतात खळबळ उडाली असताना भिवंडीत युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल पाटील व प्रदेश सचिव निलेश झेडगे यांच्या नेतृत्वाखाली नारपोली येथे शनिवारी अभिनव आंदोलन करीत या निर्णयास विरोध दर्शवित राहुल गांधी यांना समर्थन दिले आहे.

राहुल गांधी यांच्याविरोधात ज्या पद्धतीने घाईघाईत कारवाई केली जात आहे त्यामुळे लोकशाही मरणासन्न अवस्थेत आली आहे .त्यामुळे युवक काँग्रेस कार्यकर्त्यानी प्रतिकात्मक लोकशाहीला स्ट्रेचर वर झोपवून या निर्णया विरोधात व राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: Innovative movement of Youth Congress in Bhiwandi in support of Rahul Gandhi