शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

ठाण्यात मेट्रोसाठी रातोरात केली झाडांची अमानुष कत्तल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 2:22 AM

मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्षांची कत्तल केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ठाण्यातही तीनहातनाका परिसरात मध्यरात्री २ च्या सुमारास मेट्रो-४ च्या कामासाठी वृक्षांची कत्तल केली जात असल्याची बाब समोर आली.

ठाणे : मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्षांची कत्तल केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ठाण्यातही तीनहातनाका परिसरात मध्यरात्री २ च्या सुमारास मेट्रो-४ च्या कामासाठी वृक्षांची कत्तल केली जात असल्याची बाब समोर आली. यानंतर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही कत्तल तूर्तास थांबविली आहे. मात्र, या वृक्षतोडीला परवानगी होती का? न्यायालयाने स्थगिती उठविली होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. मेट्रो प्रकल्पासाठी झाडे तोडण्यासंदर्भात दाखल याचिकेवरील स्थगिती उठवली असल्यानेच फांद्या तोडल्या असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले असले, तरी पर्यावरणासाठी झाडे तोडू देणार नाही, असा पवित्रा मनसे आणि म्युज संस्थेने घेतला असल्याने भविष्यात मेट्रोसाठी वृक्षतोड करण्यासंदर्भातील प्रकरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ च्या प्रकल्पाचे काम ठाण्यात जोमाने सुरू असून तीनहातनाक्यावर मेट्रोचे स्टेशन येणार आहे. या प्रकल्पाच्या आड येणाऱ्या झाडांची यासाठी कत्तल केली जाणार आहे. मात्र, पर्यावरणाची हानी यामुळे होऊ नये, यासाठी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यानंतर, मेट्रोसाठी झाडांची कत्तल करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, ती २५ तारखेला उठवल्यानंतर काही दिवसांपूर्वी आरे कॉलनीत मध्यरात्री जो झाडे तोडण्याचा प्रकार घडला, त्याच प्रकाराची पुनरावृत्ती बुधवारी मध्यरात्री ठाण्यातील तीनहातनाका परिसरात घडला. रात्री २ च्या सुमारास या परिसरातील काही झाडांच्या फांद्या तोडण्याचा प्रकार होत असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मिळाली. त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार आपण थांबवला असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार होत असताना एमएमआरडीएचा कोणीही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले.दुसरीकडे रात्री हा सर्व प्रकार झाल्यानंतर दुपारी म्युज संस्थेने लुईसवाडी येथील सर्व्हिस रोड परिसरात निदर्शने करण्यात आली. म्युज संस्थेचे नितीन बंगेरा यांनी हे आंदोलन केले असून यावेळी त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा केली. ठाण्यात मेट्रोसाठी जवळपास १०२३ झाडांची कत्तल केली जाणार आहे.हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे म्यूज संस्थेचे नितीन बंगेरा यांनी स्पष्ट केले असून याला मनसेचेदेखील पाठबळ मिळणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितल्याने मेट्रोच्या वृक्षतोडीचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे यासंदर्भात एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. बुधवारी मध्यरात्री कोणत्याही प्रकारची वृक्षतोड केली नसून केवळ झाडांच्या फांद्या कापल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वृक्षतोड झाली हे वृत्त खोटे आहे. या प्रकल्पासाठी वृक्षतोडीवरील स्थगिती उठवली असून यासंदर्भातील सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व कामकाज नियमानुसारच सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.अवमान याचिका दाखल करणारमेट्रोसंदर्भात दोन याचिका दाखल असून एका याचिकेमध्ये मेट्रो प्रकल्पासाठी भूमिगत मेट्रोचा पर्याय असताना एलिव्हेटेड मेट्रोसाठी वृक्षतोड करू नये, अशी मागणी केली होती. २५ नोव्हेंबरला यासंदर्भात न्यायालयात स्थगिती उठवण्यात आली असली, तरी दुसºया याचिकेमध्ये ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने तीन हजार ६०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्याला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर, यासंदर्भात ३ डिसेंबरला सुनावणी होणार असून तोपर्यंत शहरातील एकही झाड तोडू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यासंदर्भात अवमान याचिका दाखल करणार असून जनआंदोलनदेखील उभे केले जाणार आहे . - रोहित जोशी, याचिकाकर्तेसुनावणी घेतलीच नाही : मेट्रो प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने परवानगी देताना सूचना आणि हरकतींसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यावेळीच आम्ही मेट्रोला जर भूमिगत करण्याचा पर्याय उपलब्ध असेल तर ती भूमिगत करून झाडे तोडू नये, अशी हरकत घेतली होती. मात्र, आमच्या हरकतीवर ठाणे महापालिकेने सुनावणी घेतली नाही. वारंवार विचारणा करूनही एकाही अधिकाºयांनी सुनावणी घेतली नसल्याने आता यासंदर्भांत आंदोलन करण्यात येणार आहे. - नितीन बंगेरा, म्यूज संस्थारात्री झाडे तोडण्याची गरजच काय? : मेट्रो प्रकल्पासाठी वृक्षतोडीच्या प्रस्तावावर स्थगिती उठली असली, तरी मध्यरात्री अशा प्रकारे झाडे तोडण्याचा हा काय प्रकार आहे. एवढ्या रात्रीत झाडे तोडण्याची आवश्यकताच काय आहे. सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. झाडे वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत, त्यांच्या पाठीशी मनसे उभी राहील. - अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे

टॅग्स :thaneठाणेMetroमेट्रो