Infection of 32 members of the family who came together for Ganpati in Kalyan | बापरे! कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 32 जणांना कोरोनाची लागण

बापरे! कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 32 जणांना कोरोनाची लागण

कल्याण: कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रात कोरोना विषाणूचा कहर सुरूच असून कोरोना रुग्णांचा आकडा आजमितीला 30हजार पार झालेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के आहे हे समाधानकारक असले तरी रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्याच्या तुलनेत 1.08 टक्क्यांनी वाढले आहे. मृत्यूदर हा आधी 1.09 इतका होता. आजच्या घडीला हा दर 2.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी परिक्षेत्रातील मृत्यूदर कमी असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केला आहे. तर कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 32 जण पॉझिटिव्ह आले आहेत. शिवसेना नगरसेवक आणि माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्टसुद्धा केली.

कल्याण-डोंबिवलीत पुन्हा कोरोनाच कहर सुरू झाला असून गेल्या 3 दिवसांपासून 400 वरती रुग्ण येत आहेत. तर एकूण कोरोनाचे रुग्ण 30 हजार वरती गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के आहे हे समाधानकारक असले तरी रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्याच्या तुलनेत 1.08 टक्क्यांनी वाढले आहे. मृत्यूदर हा आधी 1.09 इतका होता, आजच्या घडीला हा दर 2.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी परिक्षेत्रातील मृत्यूदर कमी असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केला आहे.

दुसरीकडे कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 30 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. कल्याणमधील जोशीबाग येथे एक 40 जणांचा परिवार गणेश उत्सवात आरतीसाठी एकत्र आला होता, त्यातील एका मुलाला लागण झाली. त्यातून पुढे 40 पैकी 30 जण पॉझिटिव्ह आले. याला केडीएमसी अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दुजोरा दिला आहे.

Read in English

Web Title: Infection of 32 members of the family who came together for Ganpati in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.