शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मीरा भाईंदर शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ ; एमआयडीसी कडून ५ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा

By धीरज परब | Updated: June 11, 2024 17:19 IST

मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते .

मीरारोड : मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते . मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कडे पाठपुरावा केल्या नंतर ८ जून पासून शहराला ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून दिले असून आणखी ५  दशलक्ष लिटर पाणी सुद्धा लवकरच वाढवून मिळेल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे . यामुळे दर आठवड्याच्या शट डाऊन मुळे पाणी समस्येचा नागरिकांचा त्रास काही अंशी कमी होईल असे त्यांनी सांगितले . 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून मीरा भाईंदर शहराला १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे . परंतु एमआयडीसी मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी देत होती . त्यातच विविध दुरुस्ती आणि देखभाल कामे , जलवाहिनी फुटणे आदी कारणांनी  शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत होण्यास चार चार दिवस लागतात . आधीच पाणी कमी मिळते त्यात शटडाऊन मुळे आणखी पाणी टंचाई लोकांना सहन करावी लागत असते असे आ .सरनाईक म्हणाले . 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पाण्यात वाढ करण्यासाठी तसेच मंजूर कोट्यानुसार १२५ दशलक्ष लिटर  पाणी पुरवठा मिळावा या साठी शासन आणि एमआयडीसी कडे पाठपुरावा केला जात होता . महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारवी जलशुध्दीकरण केंद्र येथील काही कामे तसेच कटईनाका ते शिळफाटा पर्यंतची जलवाहिनी कामे अपुर्ण असल्यामुळे ती पुर्ण झाल्याशिवाय पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे गेल्या ३ - ४ वर्षां पासून प्रशासन सांगत होते . 

गेल्या काही दिवसात  सलग शटडाऊन मुळे तसेच पाण्याची गळती कारणांनी शहरातील पाणी पुरवठ्यावर जास्तच विपरीत परिणाम झाला होता . त्यामुळे अनेक भागात ३ - ३ दिवस पाणी लोकांना मिळाले नाही अश्या तक्रारी वाढल्या . शहरातील सद्याची तसेच भविष्यातील पाण्याची मागणी पुर्ण करण्यासाठी सुर्या प्रकल्पातून शहरासाठी सुमारे २१८ एम.एल.डी. पाणी पुरवठा योजना मंजूर असून त्याला आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे . सूर्याचे पाणी मिळणे सुरु होताच शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे . 

परंतु सद्यस्थितीत होत असलेल्या पाणी पुरवठ्यात किमान १० दशलक्ष लिटर पाणी तात्काळ वाढवून देण्या संदर्भात आ . सरनाईक यांच्या मागणी नुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे नुकतीच बैठक झाली . त्या बैठकीत मंत्री सामंत यांनी  मंजूर कोट्यानुसार मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करावा असे निर्देश दिले .

त्यानुसार ८ जून पासून शहराला एमआयडीसी कडून आणखी ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून मिळाले आहे . त्यामुळे एमआयडीसी कडून १२० दशलक्ष लिटर पाणी मिळू लागले असून उर्वरित ५ दशलक्ष लिटर पाणी सुद्धा लवकरच मिळेल असे आ . सरनाईक म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMIDCएमआयडीसीWaterपाणीUday Samantउदय सामंत