जिल्ह्यात १९३६ रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 06:27 AM2020-09-24T06:27:37+5:302020-09-24T06:27:49+5:30

२९ जणांच्या मृत्यूची नोंद : प्रशासनाची चिंता वाढली

An increase of 1936 patients in the district | जिल्ह्यात १९३६ रुग्णांची वाढ

जिल्ह्यात १९३६ रुग्णांची वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी एक हजार ९३६ रुग्णांसह २९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक लाख ६३ हजार ५९५ तर मृतांची संख्या आता चार हजार २३४ झाली आहे.


बुधवारी सर्वाधिक ठाणे महानगरपालिका हद्दीत ४६५ बाधितांची, तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ३३ हजार ९९० तर, मृतांची संख्या ९४५ वर गेली आहे. कल्याण-डोंबिवलीत ४६३ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या ३९ हजार ९३१ तर मृतांची संख्या ७८५ वर गेली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये २०७ रुग्णांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १७ हजार ९३ तर मृतांची संख्या ५२८ इतकी झाली आहे.


भिवंडी महापालिका क्षेत्रात ५३ बाधितांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या चार हजार ८३५ तर मृतांची संख्या ३०२ झाली. तसेच उल्हासनगर ७२ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या आठ हजार ८२० तर मृतांची संख्या २७९ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६९ रुग्णांची तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या पाच हजार ९४२ तर मृतांची संख्या २२० झाली. बदलापूरमध्ये ५८ रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ७२१ इतकी झाली.

नवी मुंबईत
४१९ रुग्ण वाढले

1नवी मुंबई : शहरात बुधवारी ४१९ रूग्ण वाढले. नेरूळ व बेलापूरमध्ये प्रत्येकी ८२ रूग्ण वाढले आहेत. शहरातील एकूण रूग्ण संख्या ३४१७४ झाली आहे. नवी मुंबईमध्ये उपचारादरम्यान ७ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबळींची संख्या ७१७ झाली आहे. दिवसभरात ३४५ रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २९८७२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

वसई-विरारमध्ये
२२३ नवे रुग्ण

2वसई : वसई-विरार शहरात बुधवारी दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर २२३ नवीन बाधित रुग्ण आढळले. मात्र दिवसभरात १६३ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या २१ हजार ४०४ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत एकूण मुक्त रुग्णसंख्या १८ हजार ६०३ इतकी झाली आहे.


रायगडमध्ये ६१३ नव्या रु ग्णांची नोंद
3अलिबाग : रायगड जिल्ह्यात बुधवारी २३ सप्टेंबर रोजी ६१३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधीतांची संख्या ४३ हजार ७९ वर पोचली आहे. दिवसभरात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण ११५९ जणांना मृत्यूने कवटाळले आहे

Web Title: An increase of 1936 patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.