शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:33 IST

उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेत शिंदेसेनेच्या पाठिंब्याने सदाशिव पाटील यांना ३२ मते पडली तर अंबरनाथ विकास आघाडीकडे २८ मते पडली

ठाणे - अंबरनाथ नगरपरिषदेत मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला आहे. याठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने काँग्रेसशी युती केली होती. त्यानंतर काँग्रेसने तिथल्या १२ नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर भाजपाने या १२ नगरसेवकांचा स्वतंत्र गट बनवला होता. मात्र सोमवारी याठिकाणी उपनगराध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार होती. त्यात भाजपाला मोठा झटका बसला आहे. 

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या खेळीमुळे भाजपाच्या तोंडचा सत्तेचा घास निसटला आहे. या नगरपरिषदेत शिंदेसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांना सोबत घेत शिंदेसेनेने भाजपाचा डाव उलथावून लावला. उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेत भाजपाचे प्रतिक पाटील यांना २८ तर शिंदेसेनेचा पाठिंबा मिळाल्याने राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील ३२ मतांनी उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले. या घटनेमुळे भाजपाला मोठा धक्का बसला. त्यानंतर नगरपरिषदेच्या इमारतीत भाजपा आणि शिंदेसेना आमनेसामने आल्याचे दिसून आले. त्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून शिंदेसेनेविरोधात गद्दार, गद्दार अशी घोषणाबाजी करण्यात आली.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक अंबरनाथ नगरपरिषदेत आहेत. या चौघांसाठी पक्षाचे नेते अभिजीत करंजुले यांनी व्हिप जारी केला होता. जर कुणी पक्षाच्या भूमिकेविरोधात जात भाजपा उमेदवाराच्या विरोधात मतदान केले तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते असा हा व्हिप होता. मात्र शिंदेसेनेने या चौघांच्या पाठिंब्यावर बहुमत मिळवत सदाशिव पाटील यांना उपनगराध्यक्ष बनवले. यामुळे भाजपा आणि शिंदेसेनेत तणाव निर्माण झाला. संपूर्ण निवड प्रक्रिया नियमांविरोधात आहे आणि आम्ही याला कोर्टात आव्हान देऊ असं भाजपाने म्हटलं आहे. ज्या ४ राष्ट्रवादी नगरसेवकांनी शिंदेसेनेची साथ दिली. ते आधी अंबरनाथ विकास आघाडीचा भाग होते. ही तीच आघाडी आहे ज्यात भाजपाचे १४, काँग्रेस १२, राष्ट्रवादी ४, १ अपक्ष आणि नगराध्यक्षासह ३१ सदस्य आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृतपणे याची नोंद केली होती. मात्र अचानक या आघाडीविरोधात जात राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांनी शिंदेसेनेची साथ घेतली. त्यामुळे नवीन पेच निर्माण झाला आहे.

उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेत शिंदेसेनेच्या पाठिंब्याने सदाशिव पाटील यांना ३२ मते पडली तर अंबरनाथ विकास आघाडीकडे २८ मते पडली. या निकालामुळे तणावाचे वातावरण नगरपरिषदेच्या इमारतीत होते. काँग्रेस आणि भाजपा समर्थकांनी चोर मामा, गद्दार मामा असे नारे दिले. श्रीकांत शिंदे जेव्हा याठिकाणी पोहचले तेव्हा भाजपा आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली. मात्र ऐनवेळी शिंदेसेनेच्या खेळीने भाजपाला झटका बसल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू झाली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena outmaneuvers BJP in Ambernath; NCP gains advantage.

Web Summary : In Ambernath, Shinde Sena backed NCP's Sadashiv Patil for Deputy Mayor, defeating BJP. This alliance, defying a party whip, caused tension, with BJP alleging procedural violations and planning legal action. The unexpected move sparked protests and accusations of betrayal.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५BJPभाजपाShrikant Shindeश्रीकांत शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार