शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

जोशी-तावडे, एकाच सोसायटीत; पण गेले वेगवेगळ्या वॉर्डात, काय आहे ही भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 12:01 IST

इमारतीच्या गेटचे झाले विभाजन : प्रभाग रचनेवर ठाणेकर भडकले

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केलेल्या प्रभागरचनेबाबत ठाणेकरांनी हरकती व सूचनांचा अक्षरश: पाऊस पाडला. शेवटच्या दिवसापर्यंत १, ९६२ हरकती घेण्यात आल्या. एकाच सोसायटीमधील दोन इमारती दोन वेगवेगळ्या वॉर्डात, रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडचा भाग एकाच वॉर्डात अशा अनेक सुरस व चमत्कारिक बाबी नोंदलेल्या हरकतींमुळे उघड झाल्या. यामुळे प्रभागरचनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

काही हरकतींमध्ये भाषा एकसारखी असून, खाली स्वाक्षरी करणारी मंडळी वेगवेगळी आहेत. त्यामुळे या हरकती हा सध्या प्रभागरचनेवरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादंगाचा परिपाक असल्याची चर्चा आहे. ठाणे  महापालिकेच्या निवडणुकांकरिता प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली; परंतु यावरून सध्या मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीने सत्ताधारी शिवसेनेवर अंगुलीनिर्देश करीत आपल्या मर्जीतील आराखडा निवडणूक आयोगाला सादर केल्याचा दावा केला आहे, तर राष्ट्रवादीनेच आराखडा बदलल्याचा पलटवार शिवसेनेने केला. आराखडा सादर झाल्यानंतर सीमांकनाच्या मुद्द्यावरून अनेकांनी आक्षेप घेतले. कुठे इमारतीच्या पोडीयमवरून, तर कुठे रेल्वे क्रॉसिंग करून प्रभागांची रचना करण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात अशा प्रकारची प्रभागरचना केव्हाच झाली नसल्याचे दाखले अनेकांनी दिले.  सत्ताधारी शिवसेनेनेही प्रभागरचनेवर हरकती घेतल्या.सोमवारी शेवटच्या दिवशी १,९६२ नागरिकांनी निवडणूक विभागाकडे हरकती नोंदविल्या. यामध्ये ढोकाळी, बाळकूम आदी परिसरातून म्हणजेच प्रभाग क्रमांक ३, ४ आणि ९ मधून तब्बल १०० तक्रारी प्राप्त झाल्या. एका सोसायटीचे दोन तुकडे करून दोन प्रभागात समावेश, सोसायटीच्या गेटचे विभाजन करून एक इकडे, तर दुसरे तिकडे अशा चुकीच्या पद्धतीने सीमांकन केल्याचे तक्रारींमध्ये नमूद केले. 

 मजकूर सारखा, सह्या निराळ्या

अनेक तक्रारींमध्ये पत्राचा मजकूरसारखा असून, सह्या करणाऱ्यांची नावे वेगवेगळी आहेत. तसेच मतदार यादीवरून अनेकांनी आक्षेप नोंदविल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी प्रभागातील आपल्याला अनुकूल लोकसंख्या दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्याचा फटका आपल्याला बसू शकतो हे लक्षात आल्याने अनेक नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हरकती नोंदवल्या. २६ फेब्रुवारी रोजी हरकतींवर सुनावणी हाेईल. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाElectionनिवडणूक