भिवंडीत तृतीयपंथ्यावर सामूहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक
By नितीन पंडित | Updated: January 8, 2023 18:01 IST2023-01-08T18:00:51+5:302023-01-08T18:01:37+5:30
भिवंडीत तृतीयपंथ्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

भिवंडीत तृतीयपंथ्यावर सामूहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक
भिवंडी: १९ वर्षीय तृतीयपंथ्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत शुक्रवारी घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील आजादनगर परिसरात असलेल्या एका खोलीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांवर अनैसर्गिक अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली असून सोमवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तहाल सलीम खान वय २३,आणि शाहिद वय २५ वर्ष असे गुन्हा दाखल झालेल्या नरधमांची नावे आहेत.
१९ वर्षीय पीडित तृतीयपंथी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर दोन्ही नराधमही त्याच परिसरात राहत असल्याने पीडित ओळखत होती. त्यातच ६ जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पीडित तृतीयपंथी घरानजीक असलेल्या किराणा दुकानात दूध, अंडी पाव , आण्यासाठी गेला असता, त्या ठिकाणी परिसरात राहणाऱ्या दोघा नराधमाने दारू पिण्यासाठी पीडितला आग्रह केला. मात्र त्याला नकार दिला. त्यानंतर नराधमाने तुझ्याकडे आमचे काम आहे. तुझ्याशी काही बोलायचे आहे. असे बोलून पीडितला नराधम शहीद याने त्याच्या खोलीत घेऊन आला. त्यानंतर खोलीचा आतून दरवाजा बंद करून पुन्हा पीडितला दारू पिण्यास आग्रह केला. मात्र पीडितने नकार देताच दोन्ही नराधमांनी बेदम मारहाण करून पीडित तृतीयपंथ्यावर बळजबरीने तीन ते चार तास अळीपाळीने अनसैर्गिक अत्याचार केले.
अनसैर्गिक अत्याचार केल्यानंतर पहाटे पीडितला खोली बाहेर काढले. आणि घडलेल्या प्रकाराची कुठेही वाचता केली तर ठार मारण्याची नराधमांनी धमकी दिली. त्यानंतर पीडित बेदम मारहाण आणि अनसैर्गिक अत्याचाराचा त्रास असाह्य झाल्याने पीडितने घडलेला प्रसंग घरच्यांना व गुरुला सांगितला. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाणे गाठून पीडितने पोलिसांसमोर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच दोन्ही नराधमांविरोधात गुन्हा दाखल करून पोलीसांनी दोघांना अटक केली असून या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी दिली आहे.