शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

भाईंदरमध्ये शिवसैनिकांनी फिरवली बंडखोरांकडे पाठ, शिवसेनेच्या बैठकीला केली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 13:06 IST

दुसरीकडे सृष्टी परिसरात माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्या कार्यालयाजवळ बोलावलेल्या शिवसेनेच्या बैठकीस उपनेते विनोद घोसाळकर मार्गदर्शन करण्यास आले होते.

मीरा रोड : आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंसोबत केलेल्या बंडखोरीनंतर येथील नगरसेवक, शिवसैनिकांनी बंडखोरांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मीरा-भाईंदर शिवसेनेची गेली १५ वर्षे जबाबदारी असलेले आमदार सरनाईक बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने मीरा-भाईंदर सेनेला मोठा धक्का बसण्याची चर्चा होती. परंतु शनिवारी पूर्वेश सरनाईक यांनी आ. सरनाईक यांच्या मीरा रोड स्थित मंगल नगर कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत नगरसेवक राजू भोईर, अनंत शिर्के, नगरसेविका संध्या पाटील, स्वीकृत सदस्य विक्रमप्रताप सिंह आदी उपस्थित होते. सुरुवातीला तर बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. दुसरीकडे सृष्टी परिसरात माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्या कार्यालयाजवळ बोलावलेल्या शिवसेनेच्या बैठकीस उपनेते विनोद घोसाळकर मार्गदर्शन करण्यास आले होते. यावेळी गटनेत्या नीलम ढवण, नगरसेवक प्रवीण पाटील, कमलेश भोईर, दिनेश नलावडे, जयंतीलाल पाटील,  नगरसेविका शर्मिला बगाजी, भावना भोईर, हेलन गोविंद, अर्चना कदम,  स्नेहा पांडेसह शंकर वीरकर, प्रशांत पालांडे, सुप्रिया घोसाळकर, लक्ष्मण जंगम, संदीप पाटील, जयराम मेसे, शैलेश पांडे, स्नेहल सावंत आदी उपस्थित होते. नगरसेविका कुसुम गुप्ता यांचे पती संतोष, नगरसेविका तारा घरत यांचा मुलगा पवनसुद्धा शिवसेनेच्या सभेत होते. 

बैठकीला जाणे टाळल्याची चर्चानगरसेविका भावना भोईर सेनेसोबत तर पती राजू हे बंडखोर गटात उपस्थित होते. नगरसेविका वंदना पाटील यांचा मुलगा विराज सेनेसोबत तर वडील विकास हे बंडखोर गटात दिसले. तर विरोधी पक्षनेते धनेश पाटीलसह नगरसेविका वंदना पाटील, कुसुम गुप्ता आदी काहींनी दोन्ही ठिकाणी बैठकीला जाणे टाळल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे