Maharashtra Election 2019 : शिवरायांच्या पुतळ्यापेक्षा त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 09:33 PM2019-10-12T21:33:05+5:302019-10-12T21:33:55+5:30

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

Improve the situation of the forts in the state - Raj Thackeray | Maharashtra Election 2019 : शिवरायांच्या पुतळ्यापेक्षा त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा- राज ठाकरे

Maharashtra Election 2019 : शिवरायांच्या पुतळ्यापेक्षा त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा- राज ठाकरे

googlenewsNext

ठाणेः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शिवस्मारकावरून राज ठाकरेंनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शिवछत्रपतींच्या समुद्रातील पुतळ्याबद्दल फक्त शिवस्मारक म्हणून निवडणुकांचा प्रचार सुरू आहे, पण अजून काही घडलं?, नाही. माझं आजही ठाम मत आहे शिवरायांच्या पुतळ्यापेक्षा त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा, ती खरी महाराजांची स्मारकं आहेत, असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. कल्याणमधील सभेत ते बोलत होते. 

चायनीज वस्तू वापरू नका, असं सरकारनं सांगितल्यानंतर आम्ही चायनीज गोष्टी बंद केल्या. चायनीज फूड खाऊ नका, असं कोणी बोललं नाही. जेव्हा डोकलामचा वाद सुरू होता, तेव्हा वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिकडे बनत होता. मग तो का आणला?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

शिवसेना-भाजप ह्या राजकीय पक्षांना शहरांमध्ये 25-25 वर्ष सत्ता देऊनही शहरात जो विकास घडवता आला नाही त्याही पेक्षा उत्तम विकासकामं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फक्त 5 वर्षांत करून दाखवली होती. गुजरातमध्ये जेव्हा परप्रांतीयांना हुसकावण्याची आंदोलनं झाली आणि नंतर ते आंदोलन करणारा नेता भाजपमध्ये जातो तेव्हा कुठल्याही राष्ट्रीय माध्यमांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. पण आम्ही स्थनिकांसाठी आंदोलनं केली तर आमच्यावर खटले भरले जातात, असंही राज ठाकरे म्हणाले. 

Web Title: Improve the situation of the forts in the state - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.