शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पैशांच्या हव्यासापोटी क्लस्टर योजना अंमलात आणली; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 17:52 IST

जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले. 

किसनगरमध्ये १९९७ मध्ये झालेल्या साईराज इमारत दुर्घटनेनंतर क्लस्टरचे स्वप्न पाहिले. ते आता प्रत्यक्षात येत आहे. ठाण्यातच नव्हे, तर मुंबई, मीरा-भाईंदरलाही क्लस्टर राबविले जाणार आहेत. पावसाळ्यानंतर त्याला सुरुवात केली जाईल,  अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात केली. 

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन किसननगर येथे सोमवारी पार पडले. यावेळी दुर्घटनाग्रस्त साईराज इमारतीतील एका कुटुंबाच्या हस्तेही नारळ वाढवण्यात आला. क्लस्टर याेजनेचे कार्यालय कशीश पार्क येथे सुरू करण्यात आले आहे. मात्र या योजनेवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. 

क्लस्टरमधून अब्जावधी रुपये मिळतील आणि पुढच्या १० पिढ्या बसून खातील या हव्यासापोटी क्लस्टर योजना राबविल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पैशांच्या हव्यासापोटी या प्रकारची क्लस्टर योजना अंमलात आणली आहे. जी पुढील ५० वर्षे पूर्ण होऊ शकत नाही, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले. 

दरम्यान,  प्रत्यक्षात घराची चावी दिली जाईल, तो दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा असेल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे असते तर त्यांनी पाठ थाेपटली असती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या याेजनेला तत्त्वत: मान्यता मिळाली. खऱ्या अर्थाने २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी त्यातील त्रुटी दूर केल्या. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्लॉट उपलब्ध केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

पहिल्या टप्प्यात १० हजार घरे

आता निवडणुका नाहीत, तरी प्रत्यक्षात क्लस्टरचे काम सुरू केले असल्याचे सांगत पहिल्या टप्प्यात दहा हजार घरे बांधणार असून, १,५०० हेक्टर जागेवर ही याेजना राबवली जाणार आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार