शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर पालिका उद्यानात बेकायदा चित्रीकरण

By admin | Updated: September 1, 2016 02:54 IST

मीरा-भार्इंदर पालिकेच्या पश्चिमेकडील राव तलाव उद्यानात एका हिंदी मालिकेचे मंगळवारी बेकायदा चित्रीकरण सुरु असल्याचे उघड झाले.

भाईंदर : मीरा-भार्इंदर पालिकेच्या पश्चिमेकडील राव तलाव उद्यानात एका हिंदी मालिकेचे मंगळवारी बेकायदा चित्रीकरण सुरु असल्याचे उघड झाले. चित्रीकरणाबरोबरच मेजवानीचा बेतही तंबू ठोकून आखला होता. त्याचे कोणतेही शुल्क पालिकेने वसूल केले नाहीच. या उलट उद्यानाबाहेरील इमारतींजवळही होत असलेल्या चित्रीकरणाच्या करवसुलीवर पाणी सोडल्याचे निदर्शास आले आहे. प्रभाग अधिकारी वासुदेव शिरवळकर यांनी मात्र या चित्रीकरणासाठी १५ हजार कर भरल्याचा दावा केला आहे. परंतु, भरण्यात आलेला कर कोणत्या ठिकाणाच्या वापरासाठी आहे, हे मात्र ते स्पष्ट करु शकले नाहीत. महासभेत मराठी आणि हिंदी मालिकांच्या चित्रीकरणासाठी अनुक्रमे ५ व १५ हजार कर वसूल करण्याच्या ठरावाला मान्यता देण्यात आली. त्यात स्टुडिओेत होणाऱ्या चित्रीकरणाला बगल दिली असून रस्त्यांसह अन्य ठिकाणी होणाऱ्या चित्रीकरणाला कराच्या जाळ्यात आणले आहे. त्याचे अधिकार प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु, अनेकदा चित्रीकरणाचा कर वसूलच केला जात नाही. यात पालिकेचे नुकसान होऊनही एकाही लोकप्रतिनिधीने त्यावर आक्षेप घेतलेला नाही. काही दिग्दर्शकांकडून कराचा भरणा केला जात असला तरी काहीजण मनोज नावाच्या मध्यस्थामार्फत अधिकाऱ्यांना चिरीमिरी देत चित्रीकरण कोणत्याही अडचणीविना पार पाडतात. असाच प्रकार भार्इंदर पश्चिमेकडील कोळीवाड्यातील रावतलाव उद्यानात घडला. या उद्यानाजवळ काही खाजगी इमारतींमध्ये चित्रीकरण होत होते. त्याचे सर्व साहित्य उद्यानात ठेवले होते. चित्रीकरणासह त्याचे साहित्य ठेवण्यासाठी ते मंगळवारी उशीरापर्यंत खुले ठेवले होते. त्यातच या उद्यानाच्या मारुती मंदिराबाजूकडील भागात मेजवानीसाठी तंबू ठोकले होते.