शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

सवलती घेता, तर घरे स्वस्त द्या! एकनाथ शिंदे यांची बिल्डरांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:50 AM

बिल्डरांना सूट, सोयी-सुविधा दिल्या जातील. मात्र, त्याचा फायदा ग्राहकांना घर घेताना झाला पाहिजे.

कल्याण : सर्वसामान्यांना परवडणारी घरे बिल्डरांनी बांधली पाहिजेत. राज्य सरकार व महापालिका बिल्डरांना सोयी, सवलती पुरविण्यासाठी सकारात्मक आहे. तसेच काही सूट त्यांनाही दिली जाईल. मात्र, त्याचा फायदा घर घेणाऱ्या सामान्य ग्राहकांनाही झाला पाहिजे, असे मत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केले.पश्चिमेतील फडके मैदानात ‘एमसीएचआय’ने भरवलेल्या नवव्या प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन गुरुवारी शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे, उपायुक्त विवेक पानसरे, केडीएमसीचे आयुक्त गोविंद पानसरे, आमदार विश्वनाथ भोईर, महापौर विनीता राणे, एमसीएचआयचे महेश अग्रवाल, दीपक मेहता, प्रफुल्ल शहा, बंदीश आजमेरा, अरविंद वरक, रवी पाटील, श्रीकांत शितोळे, मनोज राय, मिलिंद चव्हाण, राहुल कदम, मोहित भोईर, जोहर झोजवाला आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले, बांधकाम व्यवसायाशी १२६ अन्य छोटेमोठे उद्योग निगडित आहेत. बिल्डर हा वारेमाप नफा कमवतो, असा चुकीचा दृष्टिकोन समाजात रूढ आहे. ज्याचा मोठा व्यवसाय त्याला जास्त त्रास सहन करावा लागतो. कल्याण-डोंबिवलीतील बिल्डरांना ओपन लॅण्ड टॅक्सचा कर दर कमी करण्यात आला. आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर बिल्डरांकडून वसूल केला जाणारा विकासकर हा एकरकमी न घेता हप्त्याच्या सवलतीत भरून घेण्याचा विचार आयुक्त गोविंद बोडके यांनी करावा, असे शिंदे यांनी सूचित केले. त्याचबरोबर युनिफॉर्म डीसी रूल तयार करावा. याशिवाय, मेट्रो रेल्वेच्या विकासाप्रकरणी बिल्डरांकडून वसूल करण्यात येणाºया सेसच्या बाबतीत मंत्रालयात बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.बिल्डरांना सूट, सोयी-सुविधा दिल्या जातील. मात्र, त्याचा फायदा ग्राहकांना घर घेताना झाला पाहिजे. परवडणारी घरे बांधली पाहिजेत, याकडे बिल्डरांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. एखादा रस्ता विकसित केल्यावर घरांचे दर लगेच वाढतात. विकासाचा फटका घर घेणाºया ग्राहकांना बसता कामा नये, असेही शिंदे पुढे म्हणाले.कल्याण-डोंबिवलीत विकास परियोजना, स्मार्ट सिटी प्रकल्प राबवला जाणार आहे. रिंग रोड व मेट्रो रेल्वेमुळे वाहतुकीच्या मार्गाचे लूप तयार होणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी दूर होईल. सोयीसुविधांनी शहर सज्ज झाल्यावर घरांची मागणीही वाढणार आहे, असे शिंदे म्हणाले.सर्वसमावेशक घनकचरा प्रकल्पावर भर : कल्याणमध्ये प्रवेश करताच आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचºयाचा डोंगर दिसतो. ही बाब शहरासाठी भूषणावह नाही. आता सरकार डम्पिंगसाठी परवानगी देणार नाही. त्याऐवजी सर्वसमावेशक घनकचरा प्रकल्प उभारले जावेत, यावर अधिक भर देणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील ज्या काही समस्या आहेत. त्या एकत्रितपणे माझ्याकडे घेऊन या. त्यावर मंत्रालयात बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, अशी सूचना शिंदे यांनी महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधींना केली.उल्हास, वालधुनीसाठी सविस्तर अहवाल बनवाउल्हास व वालधुनी नदीचा विकास व नदी प्रदूषण दूर करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, असे आदेश बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.उल्हास नदी प्रदूषणप्रकरणी कोट्यवधींचा दंड ठोठावला होता. तेव्हा सरकारने अमृत योजनेंतर्गत निधी दिला होता. त्यातून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत.वालधुनी नदीचा ६५० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०११ मध्ये केडीएमसीने तयार केला होता. मात्र, तेव्हा महापालिकेकडे निधी नव्हता. आता सरकार सविस्तर अहवाल तयार करणार आहे. काळू नदीवरील धरणासाठी ३५० कोटींचा निधी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेReal Estateबांधकाम उद्योगkalyanकल्याण