शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

राज्यात सीएए बद्दल बोलता येत नसेल तर ते लांच्छनास्पद आहे: सुनील देवधर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:40 PM

भारताची नागरिकता या विषयावर बोलता येत नाही हे चालणार नाही.

डोंबिवली:  राज्यात सीएए बद्दल बोलता येत नाही तर ते लांच्छनास्पद असेल, त्यामुळे व्याख्यानाचा विषय पूर्वांचलतील बदल असा असला तरीही मी आधी सीएए वरच बोलणार  भले मला अटक झाली तरीही चालेल असे वक्तव्य त्रिपुरा राज्याचे भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी केले. ते म्हणाले की पोलीस यंत्रनेला मी आव्हान देतो की त्यांनी मला अटक करावी. डोंबिवली मध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या 23 व्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या शुभारंभाचे व्याख्यान प्रसंगी पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.

भारताची नागरिकता या विषयावर बोलता येत नाही हे चालणार नाही, आपण कुठे राहतो, हे काय सुरू आहे असा सवाल करत त्यांनी सध्याच्या महाविकास आघाडीला टोला लगावला. कम्युनिस्ट हा भारताचा एक नंबरचा शत्रू असल्याचे ते म्हणाले. त्रिपुरा राज्यात माणिक सरकारचे पितळ आम्ही उघडे केले. त्यामुळे 25 वर्षे तेथे राष्ट्रगान होऊ दिले नाही ही शोकांतिका होती. त्याची चीड सगळ्यामध्ये होतीच. जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा राज्यपाल राज्याच्या अधिवेशनात आले तेव्हा राष्ट्रगान झालं, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. प्रत्येकाला नागरिकता हवी आहे. इंदिरा गांधी, पंडित नेहरू, मनमोहन सिंग यांनी वेळोवेळी सीएए असायला हवे असे म्हंटले होते, पण दिले कोणीच नाही. ते मोदी सरकारने दिले. 

अवॉर्ड वापसी वाले लोक अवॉर्ड मॅनेज लोक होते हे देखील या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे. अवर्ड्स दिले पण त्याची रक्कम नाही दिली. पैसे ठेवले, कागद पाठवून दिले. फक्त मोदी विरोध साठी हे सगळं केलं. जगात बोंब सुरू आहे की नागरिकत्व जाईल असे खोट सांगितलं।जातं आहे. मोदी, अमित शहा यांची भाषण ऐका, हा नागरिकता देणारा कायदा आहे, काढून घेणारा नाही हे लक्षात घ्या.  नागरिकत्व आणि एनआररसी हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे भारतात कोण लोक राहतात याची नोंद असली तर फरक काय पडला, एनआरसी असावं असं कोणी सांगितलं तर ते पंडित नेहरूंनी म्हंटल होत. आसाम।मध्ये कोणी आणलं ते उच्च न्यायालयाने आदेश दिले. पण अजून मोदींनी कुठेही एनआरसी मांडलं नाही. त्यामुळे कोणालाही काढलं जाणार नाही. भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेशमधून घुसखोर आलेल्याना भारतात थांबता येणार नाही हे आवर्जून लक्षात घ्यावे असेही ते।म्हणाले.

फाळणी कोणी मागितली, ते इथं येणार मुंब्रामध्ये राहणार. सीएऐवर नका बोलू असे म्हणणारा पोलीस अधिकारी मुंबऱ्यात जाऊन तेथे काय चालले आहे हे आधी फिरून बघून या असे त्यानाआ सांगा ते येतील का ते बघा असेही देवधर म्हणाले. चितगाव येथून चकमा गायब झालेत, ते आता त्रिपुरा, आसाम, मिझोराम येथे ते आहेत. ते।मूळचे कुठले आहेत याचा अभ्यास करावा. 70 वर्षांपासून ते भारतात रहात आहेत. त्यांना भारताचे नागरिकत्व नाही हे त्यांच्यात भय आहे. अनेक प्रख्यात अभिनेत्यांची नाव घेत त्यांनी त्यांच्या मूळ नावाची माहिती सगळ्या उपस्थितांना दिली.

व्यासपीावर संस्थाध्यक्ष डॉ सुभाष वाघमारे,उपाध्यक्ष विलास जोशी,कार्यवाह डॉ दीपक कुलकर्णी हे उपस्थित होते. स्वागत गीत व ईशस्तवन आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. अरुणोदय माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी करिष्मा संजय काळे हिने म्हटलेल्या संपूर्ण  वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रम शाळेचे मुख्याध्यापक हेमंत चोपडे यांनी केले.पाहुणे परिचय संस्था सदस्य विद्याधर शास्त्री यांनी केला तर आभार अरुण ऐतवडे यांनी मानले.

दरम्यान, दुपारपासून शहरात असलेल्या देवधर यानी भाजपच्या नगरसेवक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सीएए विषयावर प्रश्न, शंका निरसन केले. आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत देवधर यांनी काही काळ चर्चा केली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाIndiaभारतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रdombivaliडोंबिवलीthaneठाणे