कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर उद्धवसेनेसोबत लढलेल्या मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा दिला. मनसेच्या या निर्णयामुळे उद्धवसेना नाराज झाली आहे. खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून याबद्दलची नाराजी बोलून दाखवत आहे. आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही हे मला पटलेले नाही, पटवून घेऊ शकत नाही. पण, नाईलाजाने काही गोष्टी कराव्या लागतात असे विधान केले आहे.
माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, "माझ्या दृष्टीने विचार केला, तर माझ्या मनाला, स्वतःला ते पटत नाही. पटणार नाही. मी पटवून घेऊ शकत नाही. पण कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात."
'राजू पाटील भेटल्यानंतरच बोलेन'
"आपण काही गोष्टी मनापासून घेतो,काही गोष्टी नाईलाजाने घेतो. या सगळ्या घटना घडत असतात. त्यामुळे तशा प्रकारच्या घटना काय घडल्या आहेत? जोपर्यंत राजू पाटील आम्हाला भेटत नाही, तोपर्यंत त्याविषयावर मी बोलू शकत नाही", असे नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
संजय राऊतांना संताप अनावर
मनसेने शिंदेसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत आपली नाराजी व्यक्त केली. "अशा राजकारणात नीतिमत्ता वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये जे घडले ती त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं."
"स्वतः राज ठाकरे यांनाही ती भूमिका मान्य नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमच्या लक्षात आले. पण मनसेच्या स्थानिक नेत्यांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नव्हती पाहिजे. त्यांच्या गटाच्या बाबतीत आमची भूमिका कठोर आणि कडवट आहे. तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात. इतरांनी त्यात घुसायचे कारण नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही अंतर्गत चर्चा करु", असे संजय राऊत म्हणाले.
Web Summary : MNS's support to Shinde Sena in Kalyan-Dombivali has upset Uddhav Sena. Bala Nandgaonkar admitted his discomfort, stating he reluctantly accepts the decision. Sanjay Raut criticized the alliance, questioning its ethics. Nandgaonkar awaits further details from Raju Patil before commenting further.
Web Summary : कल्याण-डोंबिवली में शिंदे सेना को मनसे के समर्थन से उद्धव सेना नाराज है। बाला नागांवकर ने अपनी असुविधा व्यक्त करते हुए कहा कि वे अनिच्छा से इस निर्णय को स्वीकार करते हैं। संजय राउत ने गठबंधन की नैतिकता पर सवाल उठाते हुए इसकी आलोचना की। नागांवकर ने राजू पाटिल से और जानकारी मिलने का इंतजार करने की बात कही।