भिवंडीत पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती विरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: June 6, 2023 19:23 IST2023-06-06T19:23:38+5:302023-06-06T19:23:52+5:30

आरती किरण बावीस्कर,वय २१ असे जखमी पत्नीचे नाव आहे. 

Husband fatally assaults wife in Bhiwandi Case filed against husband | भिवंडीत पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती विरोधात गुन्हा दाखल

भिवंडीत पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी : शहरात एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार ब्लेडने वार करत पत्नीला गंभीर जखमी केले असून या नंतर स्वतःवर देखील वार करून दुखापत केली.याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरती किरण बावीस्कर,वय २१ असे जखमी पत्नीचे नाव आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरती व तिचा पती किरण बावीस्कर हे आय जि एम हॉस्पीटल जवळील संघमित्र नगर येथे राहत असून सोमवारी मध्यरात्रीनंतर सव्वा तीन वाजताच्या सुमारास पत्नी आरती झोपलेली असताना पती किरण याने तिच्यावर संशयाच्या कारणावरून गळ्यावर उजव्या बाजुस ब्लेडने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.या नंतर स्वतः वर सुध्दा वार करून जखमी झाला.

घडल्या प्रकरणात पत्नी आरती हिने दिलेल्या तक्रारी वरून पती किरण विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पती जखमी असल्याने त्यास अजून पोलिसांनी अटक केलेली नाही अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे यांनी दिली आहे.
 

Web Title: Husband fatally assaults wife in Bhiwandi Case filed against husband