शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

पावणेतीन लाख रहिवासी टांगणीला, धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:41 AM

मुंंबईत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, तर ८ जखमी झाले आहेत.

ठाणे : मुंंबईत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, तर ८ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आजघडीला ठाण्यात अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असल्या तरी धोकादायक इमारतींमध्ये आजही सुमारे पावणेतीन लाख रहिवाशांचे वास्तव्य आहे. त्यात इमारत किती जुनी आहे, यावर ती पडणार की नाही, असे गणित ठरत नाही. ज्या इमारती धोकादायक यादीत नाहीत, अशा इमारतीसुद्धा यापूर्वी ठाण्यात पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावरही टांगती तलवार असून प्रशासन आणि राजकीय नेते मात्र या विषयावर श्रेयवादाच्या लढाईत ढिम्म आहेत.ठाणे महापालिका हद्दीत १०३ अतिधोकादायक म्हणजेच सी वन प्रकारात मोडणाºया इमारती असून त्यातील ९४ इमारती रिकाम्या केल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर, यातील १८ इमारतींवरच पालिकेला हातोडा टाकता आलेला आहे.उर्वरित इमारती मात्र आजही उभ्या आहेत. यामध्ये रहिवाशांचे वास्तव्य नसले, तरी येत्या काळात यातील काही कोसळल्या, तर आजूबाजूच्या रहिवाशांना मात्र निश्चित धोका होऊ शकणार आहे. दुसरीकडे ठाण्यात किसननगर, वागळे, कळवा आणि मुंब्रा यासारख्या भागांत तर अशा इमारतींचे इमलेच्या इमले उभे आहेत. किसननगर भागातील कित्येक इमारती या दाटीवाटीने उभ्या असून कोणालाही एका इमारतीतून दुसºया इमारतीमध्ये सहजासहजी उडी मारता येऊ शकत आहे.या इमारती २५ ते ३० वर्षांहून अधिक काळ जुन्या आहेत. काही इमारतींपर्यंत तर सूर्याची किरणेसुद्धा पोहोचत नसल्याचे येथे विदारक चित्र आहे. मुंब्य्राच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. कळव्यातही अनेक भागांत अशाच इमारती आ वासून उभ्या आहेत.ठाणेकरांना क्लस्टरचे गाजर दाखविण्यात आले आहे. त्यानुसार, सहा भागांमध्ये क्लस्टरचा सर्व्हेसुद्धा पूर्ण झाला आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी काही भागांत क्लस्टरचा नारळ वाढविला जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यासाठी आता राजकीय मंडळींची धावपळ सुरूझाली आहे. परंतु, असे असले तरी या धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटेल का, याचे उत्तर मात्र अद्यापही शासन किंवा या राजकीय मंडळींकडे नाही.>स्ट्रक्चरल आॅडिटनंतरही प्रश्न जैसे थेकाही वर्षांपूर्वी नौपाड्यात धोकादायक इमारत पडून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांना आपले जीव गमवावे लागले होते. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचेही बंधनकारक केले. परंतु, आजही अनेक इमारतधारक त्यासाठी पुढे येताना दिसत नाही. महापालिकेच्या आॅडिट कमिटीवर ९५ लोकांची नियुक्तीही केली आहे. त्यानुसार, यांच्या माध्यमातून स्ट्रक्चरल आॅडिटची कारवाई केली जात आहे. परंतु, असे कित्येक उपाय केल्यानंतरही आजही धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटू शकलेला नाही. या धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 55,000कुटुंबांचे वास्तव्य असून यामध्ये रहिवाशांची संख्या ही पावणेतीन लाखांच्या घरात जात आहे. त्यामुळे या रहिवाशांचा जीव आता मुंबईच्या दुर्घटनेनंतर टांगणीला लागला आहे.>ठाण्यात ४२८० इमारती धोकादायक : महापालिका हद्दीत १०३ इमारती या अतिधोकादायक आहेत, तर मुंब्य्रात १४६०, वागळे इस्टेट १३५५, उथळसर १०६, कळवा १३४, नौपाडा-कोपरी ७८२, माजिवडा-मानपाडा ६८, लोकमान्य-सावरकरनगर २१० आणि वर्तकनगरमध्ये ६२ अशा ४२८० इमारती अतिधोकादायक/धोकादायक आहेत. या इमारतींमधील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्वरूपातील पुनर्वसनासाठी पालिकेने २५७० गाळे भाड्यानेदेखील घेतले आहेत.