शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:29 IST

बेकायदा बांधकाम प्रकरणी माहिती देण्याचे कल्याण-डोंबिवली पालिकेला हायकोर्टाचे निर्देश

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत झालेल्या रेरा नोंदणी घोटाळा प्रकरणातील ६५ बेकायदा इमारतींच्या विकासकांवर काय  कारवाई केली, किती जणांना अटक केली आणि आणखी काय पावले उचलणार? याची माहिती द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला शुक्रवारी दिली.

कल्याण-डोंबिवली शहरातील ६५ इमारतींवर कारवाई करण्याचे निर्देश काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिले होते. त्यावेळी काही इमारतींमधील रहिवाशांनी विकासकाने फसवणूक केल्याचा दावा न्यायालयात केला. इमारतींना रेरा नोंदणी क्रमांक देण्यात आल्याने फ्लॅट विकत घेतले.

मात्र, विकासकाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे इमारतींची रेरा नोंदणी केल्याचे पितळ नंतर उघड झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. याच आधारावर ६५ पैकी ‘ट्युलिप’ इमारतीतील रहिवाशांनी ॲड. प्रीती वाळिंबे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी सुरू होती.

सुनावणीदरम्यान, न्यायालयाने मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना बोलावून घेत आतापर्यंत किती विकासकांवर गुन्हा दाखल केला आणि किती जणांना अटक केली? अशी विचारणा केली. केवळ गुन्हे दाखल केलेत की अटकही केलीत, याची तपशीलात माहिती द्या, असे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले.  

आता कारवाई थांबवणे अशक्य

इमारती पाडण्याचे आदेश दिल्यानंतर आता कारवाई थांबविण्याचे आदेश देऊ शकत नाही. इमारती बेकायदा आहेत. इमारत वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी विकासक आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांविरोधात दावा दाखल करा. सोसायटीच्या जागेवर तुमचा हक्क निर्माण झाल्याने कायदेशीर कार्यवाही करून न्यायालयाकडून आदेश मिळाल्यास तुम्हीच सोसायटीचा पुनर्विकास करू शकता. तुमच्या हक्काचा निवारा राखू शकता, तसे उदाहरण घालून द्या, अशी सूचना न्यायालयाने रहिवाशांना केली. तसेच संबंधित इमारतीच्या जमीन मालकांना नोटीस बजावून सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMumbai High Courtमुंबई हायकोर्टReal Estateबांधकाम उद्योगRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017