ठाण्यातील छोटया रुग्णालयांमध्ये ‘सोशल डिस्टन्स’ पाळणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 07:34 PM2020-03-29T19:34:02+5:302020-03-29T19:48:54+5:30

केवळ १० ते १५ फूटांच्या छोटया दवाखान्यात किंवा नर्सिंग होममध्ये हे सोशल डिस्टन्स कसे ठेवणार, असा प्रश्न ठाण्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना पडला आहे.

 How to follow 'Social Disaster' in small hospitals in Thane? | ठाण्यातील छोटया रुग्णालयांमध्ये ‘सोशल डिस्टन्स’ पाळणार कसे?

डॉक्टरांचा सवाल

Next
ठळक मुद्देडॉक्टरांचा सवालअवघ्या १० ते १५ फूटांच्या डिस्पेन्सरीमध्ये कोरोनाची नियमावली पाळणे अवघड

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. मात्र, केवळ १० ते १५ फूटांच्या छोटया दवाखान्यात किंवा नर्सिंग होममध्ये हे सोशल डिस्टन्स कसे ठेवणार, असा प्रश्न ठाण्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना पडला आहे. गर्दीमुळे संसर्ग झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवालही या डॉक्टरांकडून केला जात आहे.
आम्ही फॅमिली डॉक्टर म्हणून अगदी व्हॉटसअ‍ॅपद्वारेही औषधे लिहून देत मोफत सेवा देत असताना, सर्व दवाखाने व नर्सिंग होम उघडण्याचा अट्टाहास कशासाठी? असाही सवाल त्यांनी केला आहे. साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १९८७ अन्वये ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी नोंदणीकृत रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिकांच्या आस्थापना बंद राहिल्यास परवाना बंद करण्याबरोबरच फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. या आदेशाने ठाणे शहरातील नर्सिंग होम चालक डॉक्टर आणि जनरल वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये अस्वस्थता आहे. बहुसंख्य डॉक्टरांचे दवाखाने छोटेखानी दुकानांच्या गाळयात सुरु आहेत. तर एक हजार फुटांपेक्षा कमी जागेत नर्सिंग होम सुरु आहेत. बहुसंख्य डिस्पेन्सरी १० ते १२ फूट लांब जागेत आहेत. या जागेतच तपासणी कक्ष, रुग्णांसाठी आसन व्यवस्थाही आहे. आता भारतात कोरोना चा तिसरा टप्पा सुरू होत आहे. अशा परिस्थितीत एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याला जबाबदार कोण, असा डॉक्टरांचा सवाल आहे. ठाण्यातील अनेक मोठया
रुग्णालयातील ओपीडीची जागाही कमी आहे, याकडेही या डॉक्टरांनी लक्ष वेध आहे.
* छोटया वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणारे बहुतांशी रु ग्ण हे फॅमिली पेशंट वर्गातील आहेत. या पेशंटना डॉक्टरांचा मोबाईल क्र मांकही माहित आहे. त्यांना डॉक्टरांकडून व्हॉटसअ‍ॅपवर मोफत मार्गदर्शन केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत मोठी जागा असलेल्या रु ग्णालयात दाखल केले जाते. त्यानंतर त्यांची तिथे तपासणी केली जाते. मात्र, सर्व दवाखाने उघडल्यास पेशंटची गर्दी होईल. अनेक रु ग्ण रुक्तदाब किंवा मशीनने शुगर तपासणीसाठीही येतील. अशा परिस्थितीत छोटया दवाखान्यात किंवा नर्सिंग होममध्ये सहा फूट अंतर ठेवत सोशल डिस्टसिंग कसे पाळणार, असा प्रश्न डॉक्टरांचा आहे. छोटी रुग्णालये आणि ओपीडीमधील परिचारिका, मदतनीसांसह अनेक कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरी आहेत. त्यामुळे रु ग्णालये उघडण्याची सक्ती अन्यायकारक आहे. अनेक डॉक्टरांकडे मास्क व सॅनिटायझर्सही उपलब्ध नाहीत, अशाही तक्रारी या डॉक्टरांनी केल्या आहेत.
कोरोनाच्या दहापैकी नऊ रु ग्णांना सुरु वातीला लक्षणे जाणवत नाहीत. असा एखादा रु ग्ण नर्सिंग होम किंवा दवाखान्यात आढळल्यास संपूर्ण वॉर्डमधील रु ग्ण आणि नातेवाईकांना संसर्ग होण्याचीही भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.
जे. जे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची ओपीडी बंद, मग आमच्यावर सक्ती का?
मुंबईतील सर जे. जे. रु ग्णालयात ह्रदयचिकित्सा, ईएनटी ओपीडीचे काही विभाग बंद केले आहेत. ठाणे महापालिकेच्याच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओपीडी पूर्णपणे बंद आहे. रुग्णांची थेट तपासणी केली जाते. राज्य सरकार आणि महापालिकेलाही संपूर्ण क्षमतेने दवाखाना सुरू करण्यास अडचणी आहेत. अशा परिस्थितीत छोटया रुग्णालयांवर होणारी सक्ती अन्यायकारक आहे, असा मुद्दा ठाण्यातील डॉक्टरांनी मांडला. यासंदर्भात राजस्थानमधील भीलवाडा येथे झालेल्या घटनेकडे डॉक्टरांकडून लक्ष वेधले जात आहे. तेथील दवाखान्यात तीन डॉक्टर आणि तीन कंपाउंडर कोरोना बाधित आढळले होते. तर अन्य दहा निगेटिव्ह आढळले होते. मात्र, या संदर्भात महापालिकेकडून होणा-या कारवाईच्या भीतीने कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नाही.
दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या काही पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेतली. त्या वेळी झालेल्या चर्चेत ठाणे शहरातील ३० डॉक्टरांची टेलिफोन आणि व्हॉटसअ‍ॅपद्वारे सल्ला देण्यासाठी एक समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title:  How to follow 'Social Disaster' in small hospitals in Thane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.