शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: संविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार?- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 16:51 IST

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मराठा आरक्षणावरही भाष्य केलं आहे.

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मराठा आरक्षणावरही भाष्य केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत राहणार.आरक्षण हा संविधानाचा भाग आहे. ज्या सरकारमधील मंडळींचा संविधानालाच वैचारिक विरोध आहे ते आरक्षण काय देणार?, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरही ते म्हणाले, विकासाच्या, प्रगतीच्या मुद्द्यावर आपल्याला मतं मिळणार नाही हे पंतप्रधानांना कळून चुकलंय, तेव्हा मग यांना रामाची आठवण झाली, मंदिर वही बनाऐंगे पर तारीख नही बतायेंगे, 2019ची निवडणूक जवळ येतेय, सगळे मुद्दे हे आता आपल्या विरोधात आहेत हे समजल्यावर आता भावनिक मुद्द्यांना हात घालणे हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. ठाणे शहरातील मूलभूत समस्या ठाणे महापालिकेने सोडविल्या नाहीत, आजही रस्ते, कचरा, पाणी, शौचालय यांसारख्या प्राथमिक प्रश्नांकडे पालिका दुर्लक्ष करत आहे, जुनंच ठाणे पालिकेला सांभाळत येत नाही, नवीन ठाणे कसे करणार? नवीन ठाण्याचे प्लॅंनिंग बिल्डरांसाठी आहे.नवीन ठाणे करायचे असेल तर आधी या बिल्डर्सला बाहेर काढा. नवीन ठाण्याची संकल्पना ही 10 ते 12 वर्षांपूर्वी झालेली आहे. आज ठाण्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, येत्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवणार आहे, स्वतःचे धारण बांधता आले नाही. ठाणे महापालिकेची हद्द ठरली आहे मग नवीन ठाण्याचा प्रस्ताव कशासाठी आणलाय. हे सगळे प्लॅंनिंग कोणासाठी?, असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtraमहाराष्ट्र