शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरांची दुरुस्ती वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:54 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंंतर्गत उभारलेल्या घरात राहणाºयांच्या इमारतीची झाडलोट, देखभाल, दुरुस्ती केली जात नाही

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंंतर्गत उभारलेल्या घरात राहणाºयांच्या इमारतीची झाडलोट, देखभाल, दुरुस्ती केली जात नाही. या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आयुक्तांनी प्रभाग अधिकाºयांवर सोपवली असली तरी आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवण्यात येत आहेत.कचोरे येथील बीएसयूपीच्या घरात ४०० सदनिकाधारक राहतात. या सदनिकाधारकांनी देखभाल दुरुस्तीकरिता ३७ हजार ५०० रुपये महापालिकेत जमा केले आहेत. मात्र तरीही त्याठिकाणी महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीच केली जात नाही. इमारतीच्या आवारातील कचरा उचलला जात नाही. इमारतीत झाडलोट केली जात नाही. इमारतीसाठी असलेली लिफ्ट ही चार ते पाच दिवस बंदच असते. सदनिकाधारक त्याठिकाणी राहण्यासाठी गेले त्याला १८ महिने उलटून गेले. १८ महिन्यानंतरही सदनिकाधारकांना महापालिकेनी ताबापत्र दिलेले नाही. त्यामुळे सदनिकाधारकांना सोसायटी स्थापन करण्यात अडसर येत आहे. इमारतीला दिलेले सुरक्षा रक्षक नीट काम पाहत नाहीत. वृद्ध व्यक्तीची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. रिक्त सदनिकांमध्ये अवैध धंदे करणारे लोक घुसले आहेत. ते वृद्ध सुरक्षा रक्षकांना दमदाटी करुन मनमानी करतात. अनेक लोक घरात जबरदस्तीने घुसले असून त्यांनी रिक्त सदनिकांचा ताबा घेतला आहे. या सगळ््या तक्रारींचा पाढा गुलशन नगर चॅरिटेबल ट्रस्टचे हबीब शेख यांनी वाचला आहे. शेख यांचे बीएसयूपी योजनेत घर नाही. त्याठिकाणी त्यांचे भाऊ राहतात. त्या ठिकाणी राहत असलेले राशीद खान व जाफर खान यांनी शेख यांच्याकडे हा विषय मांडला. त्यांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. देखभाल दुरुस्तीचा खर्च ३७ हजार ५०० रुपये भरुनही देखभाल दुरुस्तीकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. याकडे शेख यांनी लक्ष वेधले. जवळपास ६०० सदनिका वाटप न झाल्याने धूळ खात पडलेल्या आहेत. त्याठिकाणी एक पोलीस चौकी उभारल्यास बेकायदा हालचालींना वचक बसेल, असे शेख म्हणाले.कचोरे बीएसयूपी प्रकल्पात १ हजार ८२ घरे बांधून तयार होती. त्यापैकी ४४३ घरे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली होती. ज्यांनी पैसे भरले त्यांना ताबा दिलेला आहे. ताबा देण्याची ४०० प्रकरणे प्रलंबित असतील असा आरोप शेख यांनी केला असला तरी त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत १० ते २० सदनिकाधारकांचा ताबा देणे बाकी असेल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन यांनी बीएसयूपी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीची देखभाल दुरुस्ती जोपर्यंत सोसायटी स्थापन होत नाही, तोपर्यंत करायची आहे, असे स्पष्ट केले. त्याची जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकाºयाकडे असेल. इमारतीच्या लिफ्ट नादुरुस्त झाल्या असून खिडक्यांच्या काचा फुटल्या असतील तर त्याची दुरुस्ती प्रभाग क्षेत्रातील उपअभियंत्याने करायची आहे. त्यासाठी महापालिका निधीतून पैसे खर्च केले जातील. हा आदेश वर्षभरापूर्वी रवींद्रन यांनी दिला होता. त्यांच्या पश्चात पी. वेलरासू आयुक्त आले. त्यांची बदली झाल्यानंतर आता आयुक्त गोविंद बोडके काम पाहत आहे. अद्याप रवींद्रन यांच्या आदेशाची अंंमलबजावणी महापालिका प्रभाग अधिकाºयांकडून केली गेली नाही. त्यांच्या विरोधात नंतरच्या आयुक्तांनी कारवाईचा बडगा अद्याप उगारलेला नाही.