अंबरनाथमध्ये स्टंट करणाऱ्या भरधाव अल्टोला भीषण अपघात, तीन जखमी; असे झाले गाडीचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 22:19 IST2023-04-08T22:19:21+5:302023-04-08T22:19:47+5:30
आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान लोकनगरी बायपास रस्त्यावर एका भरधाव अल्टो कारला अपघात झाला.

अंबरनाथमध्ये स्टंट करणाऱ्या भरधाव अल्टोला भीषण अपघात, तीन जखमी; असे झाले गाडीचे हाल
अंबरनाथ : अंबरनाथ बायपास रोडवर आज सायंकाळी एका अल्टो कारला भीषण अपघात घडला. या कारमधील प्रवासी गाडीच्या खिडकीमध्ये बसून स्टंट करत असल्याचे प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.
आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान लोकनगरी बायपास रस्त्यावर एका भरधाव अल्टो कारला अपघात झाला. या कारचा चालक आणि त्याच्यासोबत असलेले त्याचे सहकारी रस्त्यावर स्टंट करीत असल्यामुळेच त्यांची कार दुभाजकाला धडकल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले आहे. या अपघातात कार पुढच्या भागातून पूर्णपणे चेपली गेली आहे. या अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे अद्यापही स्पष्ट झालेले नाहीत. या जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान लोक नगरी बायपास रस्त्यावर अनेक तरुण दुचाकी आणि चार चाकी गाड्या अति वेगाने चालवत असल्याने या ठिकाणी सीसीटीव्ही लावून प्रत्येक गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली जाते.