शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या वाहतूक पोलिसाच्या प्रामाणिकपणामुळे तरुणीला मिळाला मोबाइल

By जितेंद्र कालेकर | Updated: October 12, 2019 21:28 IST

ठाण्यात रिक्षाने प्रवास करतांना प्रज्ञा दाभाडे या तरुणीचा गहाळ झालेला मोबाईल आणि काही रोकड वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार जयराम खादे यांना मिळाला. तो त्यांनी शनिवारी (१२ आॅक्टोंबर रोजी) या तरुणीला परत केल्याने खादे यांचे पोलीस वर्तुळात कौतुक होत आहे.

ठळक मुद्देरिक्षाप्रवासात झाला होता गहाळ गस्तीवरील हवालदाराने केला परत

ठाणे : एरव्ही, वाहतूक पोलिसांवर सर्रास भ्रष्टाचाराचा आरोप होत असतो. नियम मोडणा-या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली, तरी ते टीकेचे धनी होतात. अशा सर्वच चर्चांना नौपाडा वाहतूक उपविभागाचे पोलीस हवालदार जयराम खादे यांनी छेद दिला आहे. नौपाडा भागात पॉइंटतपासणी करीत असताना रस्त्यावर मिळालेला एक मोबाइल आणि काही रोकड त्यांनी प्रज्ञा दाभाडे (१९) या तरुणीला शनिवारी सुखरूप परत केल्याने तिने समाधान व्यक्त केले.उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी भागात राहणारी प्रज्ञा ही १२ आॅक्टोबर रोजी ठाणे रेल्वेस्थानक येथून वागळे इस्टेट येथे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कामावर जात होती. ती रिक्षाने जात असताना गुरु द्वारासमोरील रस्त्यावर तिचा सुमारे १५ हजारांचा मोबाइल आणि १४० रुपयांची रोख रक्कम हातातून निसटली. त्यानंतर अवघ्या काही वेळाने तिथून नौपाडा वाहतूक शाखेची पोलीस जीप तिथून पॉइंटतपासणीसाठी जात होती. वाहन चालविताना चालक पोलीस हवालदार खादे यांची नजर या मोबाइलवर गेली. रस्त्यावर मिळालेला मोबाइल आणि रोकड त्यांनी ताब्यात घेऊन तीनहातनाका येथील आपल्या वाहतूक विभागाच्या कार्यालयात जमा केली. त्यानंतर, मोबाइलच्या आधारे दाभाडे हिच्याशी संपर्क करून तिचा मोबाइल आणि रोकडही त्यांनी नौपाडा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांच्या उपस्थितीमध्ये तिला सुपूर्द केला. दाभाडे यांचे पोलीस वर्तुळात कौतुक होत आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस