The mobile roberer hit youngster by an iron rod | लोखंडी रॉडने मारहाण करून मोबाईल पळवला
लोखंडी रॉडने मारहाण करून मोबाईल पळवला

पिंपरी : मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी तरूणाच्या खिशातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाला पकडून ठेवले असता चोरट्यांनी तरूणाच्या हातावर लोखंडी रॉडने मारहाण करत मोबाईल हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. ८) रात्री आठच्या सुमारास विकासनगर किवळे येथे घडली. सुरज रंगनाथ खटकाळे (वय १९, रा. श्रीनगर रोड. ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकासनगर येथील विस्डम स्कुलच्या बाजूला असलेल्या पुलाजवळ थांबले असता तीन चोरटे मोपेड दुचाकीवरून आले. त्यांनी सुरज यांच्या खिशातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरज यांनी तीन चोरट्यांपैकी एकाला पकडून ठेवण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी सुरज यांच्या हातावर लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये सुरज यांच्या हाताला गंभीर इजा झाली. यानंतर चोरट्यांनी सुरज यांचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पोबारा केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.


Web Title: The mobile roberer hit youngster by an iron rod
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.