वाहन चोरीसह घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 00:12 IST2021-06-17T00:09:58+5:302021-06-17T00:12:48+5:30
वाहन चोरीसह घरांमध्ये चोऱ्या करणाºया बाळा गंगाधर कवळे (रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला कासारवडवली पोलिसंनी मंगळवारी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कासारवडवली भागात घरफोडी तसेच वाहन चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी या चोरीच्या तपासाचे आदेश कासारवडवली पोलिसांना दिले होते.

कासारवडवली पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाहन चोरीसह घरांमध्ये चोऱ्या करणाºया बाळा गंगाधर कवळे (रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला कासारवडवली पोलिसंनी मंगळवारी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लॅपटॉप, दोन रिक्षा आणि एक मोटारसायकल एक दुचाकी असा एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कासारवडवली भागात घरफोडी तसेच वाहन चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी या चोरीच्या तपासाचे आदेश कासारवडवली पोलिसांना दिले होते. सराईत गुन्हेगार बाळा कवळे याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे कवळे याला वागळे इस्टेट भागातून १५ जून रोजी अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्याने कासारवडवली भागातून लॅपटॉप, रिक्षा आणि मोटारसायकल चोरी केल्याची तसेच वर्तकनगर भागातूनही रिक्षा चोरी केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून हे चारही गुन्हे उघड झाले असून तीन वाहने आणि एक लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे.