शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
3
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
4
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
5
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
6
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
7
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
8
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
9
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
10
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
11
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
12
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
13
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
14
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
15
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
16
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
17
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
18
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
19
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
20
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका

शहापूरमधील प्रस्थापितांना दणका; बलाढ्य उमेदवारांना घरचा रस्ता, राष्ट्रवादी, शिवसेनेचा वर्चस्वाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 09:17 IST

शहापूर तालुक्यात २०२१ च्या सुरुवातीस गेल्यावर्षीच्या मुदत संपलेल्या, पण कोरोना महामारीमुळे पुढे ढकलेल्या दहिवली, चेरपोली, अल्याणी, भावसे, डोलखांब या पाच ग्रामपंचायतींसाठी १५ तारखेला मतदान झाले होते. एकूण सदस्य संख्या ५१ साठी १३५ अर्ज दाखल केले होते.

भातसानगर : १५ तारखेला घेतलेल्या पाच ग्रामपंचायतींचे निकाल साेमवारी जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादीने तीन, तर शिवसेनेने चार ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. राष्ट्रवादीने दहिवली, चेरपोली, अल्याणी, तर शिवसेनेने चेरपोली, डोलखांब, भावसे, आल्याणी ग्रामपंचायती जिंकल्याचे परस्पर दावे केले आहेत.शहापूर तालुक्यात २०२१ च्या सुरुवातीस गेल्यावर्षीच्या मुदत संपलेल्या, पण कोरोना महामारीमुळे पुढे ढकलेल्या दहिवली, चेरपोली, अल्याणी, भावसे, डोलखांब या पाच ग्रामपंचायतींसाठी १५ तारखेला मतदान झाले होते. एकूण सदस्य संख्या ५१ साठी १३५ अर्ज दाखल केले होते. पैकी ४५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे १९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये दहिवली ०६, चेरपोली ०३, आल्याणी ५, भावसे १, डोळखांब ४, उर्वरित ३२ जागांसाठी ७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये ३५ महिला उमेदवार, तर ३६ पुरुष उमेदवार निवडणूक लढवत होत्या. आजच्या मतमोजणीत बलाढ्य उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. सहाव्यावेळी निवडणूक लढविणारे माजी उपसरपंच विठ्ठल भेरे व दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज झुगर यांना पराभवाचा सामना करावा लागला. मागील वर्षी घरकुले मंजूर न झाल्याने ती या ग्रामपंचायतींना कोणत्याही लाभार्थ्याला देता आली नाहीत. तर पाणीपुरवठा हा कळीचा मुद्दा अनेक ग्रामपंचायतींमध्ये बनला होता.भावसे ग्रामपंचायतीतील अभिमन्यू ठाकरे, जनार्दन महाले, नयना भुसारे, सुधीर गोधडे, रोशनी वरठा, प्रज्ञा वेखंडे, छाया धपाटे, आराध्या महाले हे उमेदवार विजयी झाले आहेत. अल्याणी ग्रामपंचायतीत विनायक सापळे तीनवेळा पराभव पत्करल्यानंतर पहिल्यांदा विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अन्य दर्शना घोडविंदे, बुधाजी वाघ, मनोज दळवी हे विजयी झाले आहेत. चेरपोली ग्रामपंचायतीत जगदीश पवार हे तालुक्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले असून, त्यांना ६९७ इतकी मते मिळाली आहेत, तर अन्य चारुशीला भोये, ज्योती भोईर, प्रज्वल जाधव, ऋतुजा गावित, सुनील पांढरे, वैशाली मोरघे, राजश्री भोईर, किरण गोरे, सचिन शेलार, सुनील भेरे, तर ज्योती म्हसकर व अश्विनी फराड यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने ज्योती म्हस्कर विजयी झाल्या, तर धीरज झुगरे यांचा चार मतांनी पराभव झाला. त्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करूनही निकाल कायम राहिला, तर भावसे ग्रामपंचायतीत सुधीर गोडदे, रोशनी वराठा, प्रज्ञा वेखंदे, छाया धाप आराध्या महाले, डोलखांबमध्ये उज्वला सांबरे या विजयी झाल्या आहेत. दहिवली ग्रामपंचायतीतून अरुण पाटील, निराबाई मुकणे, जयश्री पाटील, तर डोलखांब ग्रामपंचायतीत उज्वला सांबरे, सुधाकर वाघ, रवींद्र फर्डे, सुरेश मुकणे, करुणा चौधरी हे विजयी झाले आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतthaneठाणेElectionनिवडणूक