शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रडार घेणार वादळी पावसाचा वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आगामी पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महापालिका, शासकीय कार्यालयांमध्ये आपत्ती नियंत्रण, व्यवस्थापन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : आगामी पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महापालिका, शासकीय कार्यालयांमध्ये आपत्ती नियंत्रण, व्यवस्थापन व मदत कक्ष सुरू करण्यात आले, याशिवाय जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा आधीच अचूक अंदाज प्राप्त करून देणाऱ्या रडारच्या नियोजनासह जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांच्या आवारात वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्याचे नियोजन जिल्हाभर करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना वेळीच योग्य माहिती देण्यासाठी, आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील यंत्रणांकडून विविध स्वरूपाची माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांमध्ये वीज प्रतिरोधक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मुरबाड तालुक्यातील न्याहाळी आणि तुरळक या गावांच्या परिसरात वीजप्रतिरोधक यंत्रणा सज्ज आहे. शहापूरच्या खर्डी परिसरातील वीजप्रतिरोधक यंत्रणा मात्र कालबाह्य झाल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.

वीज संकटाची चाहूल लागणार

जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी वीज पडून जीवितहानीच्या घटना घडत असतात. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात वीज प्रतिरोधक यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. लोक एकत्र ‌येणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी म्हणजे बसस्थानकाच्या परिसराचे सर्वेक्षण करून तेथे वीज प्रतिरोधक यंत्रणा उभारण्यात येत आहे. यामुळे या सार्वजनिक ठिकाणी पडणाऱ्या संभाव्य विजेच्या संकटाची जाणीव आधीच होऊन तेथील जीवितहानी टाळणे‌ शक्य होणार आहे.

------