मुसळधार पावसामुळे भिवंडीत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 18:27 IST2021-06-09T18:26:35+5:302021-06-09T18:27:09+5:30

कल्याण नाका येथे गुढगाभार पाणी साचल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Heavy rains cause traffic jams in Bhiwandi | मुसळधार पावसामुळे भिवंडीत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

मुसळधार पावसामुळे भिवंडीत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

भिवंडी ( दि. ९ ) हवामान खात्याच्या अचूक अंदाजानुसार बुधवारी पहाटेपासूनच शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पावसाचे पाणी व नाले सफाईच्या कामांमध्ये झालेल्या हलगर्जीपणामुळे शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. 

कल्याण नाका येथे गुढगाभार पाणी साचल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कल्याण नाक्यावर साचलेल्या पाण्यामुळे कल्याणरोड, अंजूरफाटा, रांजणोली बायपास नाका या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचबरोबर माणकोली नाका, वंजारपट्टीनाका, नारपोली,नझराना सर्कल, भिवंडी - वाडा रोडवरील नदीनाका अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. ठीक ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस व वार्डन यांची मोठी दमछाक झाली होती. तर वाहतूक कोंडीने प्रवाशांबरोबरच वाहन चालकांचे मोठे हाल झाले होते.
 

Web Title: Heavy rains cause traffic jams in Bhiwandi