शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘बारवी’ क्षेत्रात पावसाचा जोर, मुुंबईची पाणी चिंता कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 01:52 IST

मुुंबईची पाणी चिंता कायम : अन्य धरण पाणलोट क्षेत्रात प्रमाण कमी

ठाणे : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत केलेल्या या पावसाचा जोर बारवी धरणवगळता अन्य धरणांमध्ये नाही. धरणांचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाºया शहापूर, मुरबाडला तर अनुक्रमे ४८ मिमी आणि २४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत मोडकसागरसह तानसा, बारवी धरणांत १०० टक्के पाणीसाठा होऊन ते भरले होते. मात्र, या पावसाळ्यात धरणांमध्ये आजपर्यंत कमीअधिक ५० टक्कयांपर्यंत पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्याविषयी चिंता वाढली आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा, यंदा पाणीकपात अटळ दिसून येत आहे. मुंबईला ३०० मिमीपेक्षा अधिक पडलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण, या महानगरास आधीच २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. पाणीपुरवठा करणाº­या भातसा धरणात अवघा ५६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.भातसात ५८ टक्के तर तानसात अवघा ३५ टक्के पाणीसाठामुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडक सागर धरण गेल्या वर्षी १०० टक्के भरले होते. पण, गुरुवारी या धरणात फक्त ४६ टक्के पाणीसाठा आहे. येथे गुरुवारी ४१ मिमी पाऊस पडला. भातसा धरणात ५८ टक्के पाणीसाठा तयार झाला. गेल्या वर्षी तो ८८ टक्के होता. या धरणात गुरुवारी फक्त ५६ मिमी पाऊस पडला. तानसा धरणात फक्त ३५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ९९ टक्के होता.तर, गुरुवारी ७६ मिमी पाऊस पडला. मध्य वैतरणा धरणात आतापर्यंत ४१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो ९३.९४ टक्के होता. गुरुवारी या धरणात २९ मिमी पाऊस पडला. धरणांतील या चिंताजनक पाणीसाठ्यामुळे काळजी वाढली आहे. आगामी दिवसात धरणांच्या या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.बारवीत ५३ टक्के पाणीसाठा : ठाणे जिल्ह्यातील शहरांना, उद्योग, कारखाने आणि कंपन्यांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. गुरुवारी केवळ १०४ मिमी पाऊस पडला. तर, पाणलोट क्षेत्रातील कानिवरे १२७, कानहोळ ३८, पाटगावला ५२ आणि ठाकूरवाडीला ५१ मिमी पाऊस पडला आहे. या धरणात सरासरी ६७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या धरणाची पाणीपातळी ७२.६० मीटरपैकी सध्या ६५.६८ मीटर आहे. गेल्या वर्षी धरणात ९७ टक्के आजच्या दिवसापर्यंत असलेला पाणीसाठा आतापर्यंत ५३ टक्के झाला आहे. आंध्रा धरणात ३७ टक्के पाणीसाठा आहे. येथे गुरुवारी ५९ मिमी पाऊस पडला.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस