‘बारवी’ क्षेत्रात पावसाचा जोर, मुुंबईची पाणी चिंता कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:51 AM2020-08-07T01:51:47+5:302020-08-07T01:52:29+5:30

मुुंबईची पाणी चिंता कायम : अन्य धरण पाणलोट क्षेत्रात प्रमाण कमी

Heavy rainfall in ‘Barvi’ area | ‘बारवी’ क्षेत्रात पावसाचा जोर, मुुंबईची पाणी चिंता कायम

‘बारवी’ क्षेत्रात पावसाचा जोर, मुुंबईची पाणी चिंता कायम

googlenewsNext

ठाणे : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत केलेल्या या पावसाचा जोर बारवी धरणवगळता अन्य धरणांमध्ये नाही. धरणांचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाºया शहापूर, मुरबाडला तर अनुक्रमे ४८ मिमी आणि २४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत मोडकसागरसह तानसा, बारवी धरणांत १०० टक्के पाणीसाठा होऊन ते भरले होते. मात्र, या पावसाळ्यात धरणांमध्ये आजपर्यंत कमीअधिक ५० टक्कयांपर्यंत पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्याविषयी चिंता वाढली आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा, यंदा पाणीकपात अटळ दिसून येत आहे. मुंबईला ३०० मिमीपेक्षा अधिक पडलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण, या महानगरास आधीच २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. पाणीपुरवठा करणाº­या भातसा धरणात अवघा ५६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

भातसात ५८ टक्के तर तानसात अवघा ३५ टक्के पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडक सागर धरण गेल्या वर्षी १०० टक्के भरले होते. पण, गुरुवारी या धरणात फक्त ४६ टक्के पाणीसाठा आहे. येथे गुरुवारी ४१ मिमी पाऊस पडला. भातसा धरणात ५८ टक्के पाणीसाठा तयार झाला. गेल्या वर्षी तो ८८ टक्के होता. या धरणात गुरुवारी फक्त ५६ मिमी पाऊस पडला. तानसा धरणात फक्त ३५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ९९ टक्के होता.

तर, गुरुवारी ७६ मिमी पाऊस पडला. मध्य वैतरणा धरणात आतापर्यंत ४१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो ९३.९४ टक्के होता. गुरुवारी या धरणात २९ मिमी पाऊस पडला. धरणांतील या चिंताजनक पाणीसाठ्यामुळे काळजी वाढली आहे. आगामी दिवसात धरणांच्या या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बारवीत ५३ टक्के पाणीसाठा : ठाणे जिल्ह्यातील शहरांना, उद्योग, कारखाने आणि कंपन्यांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. गुरुवारी केवळ १०४ मिमी पाऊस पडला. तर, पाणलोट क्षेत्रातील कानिवरे १२७, कानहोळ ३८, पाटगावला ५२ आणि ठाकूरवाडीला ५१ मिमी पाऊस पडला आहे. या धरणात सरासरी ६७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या धरणाची पाणीपातळी ७२.६० मीटरपैकी सध्या ६५.६८ मीटर आहे. गेल्या वर्षी धरणात ९७ टक्के आजच्या दिवसापर्यंत असलेला पाणीसाठा आतापर्यंत ५३ टक्के झाला आहे. आंध्रा धरणात ३७ टक्के पाणीसाठा आहे. येथे गुरुवारी ५९ मिमी पाऊस पडला.

Web Title: Heavy rainfall in ‘Barvi’ area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.