शीळ डायघरमधील भंगार गोदामाला भीषण आग; 30 ते 35 गोदामे खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 17:48 IST2019-05-15T17:47:20+5:302019-05-15T17:48:29+5:30
अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नसून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

शीळ डायघरमधील भंगार गोदामाला भीषण आग; 30 ते 35 गोदामे खाक
ठाणे : ठाण्यातील शीळ डायघर भागातील गौसिया कम्पाऊंडमधील भंगाराच्या गोदामांना भीषण आग लागली आहे. यामध्ये जवळपास 30 ते 35 गोदामे जळून खाक झाली आहेत.
अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नसून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत.
घटनास्थळावरील काही दुचाकी आणि चार चाकी गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरु आहे.