भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग 

By नितीन पंडित | Updated: April 8, 2024 16:41 IST2024-04-08T16:41:09+5:302024-04-08T16:41:21+5:30

शहरातील सुभाष नगर परिसरातील मुरलीधर कंपाऊंड या ठिकाणी सोमवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली होती.

Heavy fire at a loom factory in Bhiwandi | भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग 

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग 

भिवंडी: यंत्रमाग कारखान्यास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण यंत्रमाग कारखाना जळून खाक  झाला आहे. शहरातील सुभाष नगर परिसरातील मुरलीधर कंपाऊंड या ठिकाणी सोमवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली होती.

आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला दिल्या नंतर तब्बल पाऊण तास उशीराने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.तोपर्यंत संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडून बेचिराख झाला होता.त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवर दोन तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे.दरम्यान ही आग नक्की कशामुळे लागली याचे कारण अजून अस्पष्ट असून या दुर्घटनेत कोणती ही  जीवितहानी घडली नाही परंतु कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Heavy fire at a loom factory in Bhiwandi