ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज; आरोग्याची घ्या काळजी!

By सुरेश लोखंडे | Published: April 16, 2024 09:22 PM2024-04-16T21:22:00+5:302024-04-16T21:22:10+5:30

ठाणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे प्रादेशिक हवामान विभागाकडून ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची ...

Heat wave forecast in Thane district; Take care of health! | ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज; आरोग्याची घ्या काळजी!

ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज; आरोग्याची घ्या काळजी!

ठाणे:  गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे प्रादेशिक हवामान विभागाकडून ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे . या उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.

उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेण्यासाठी सुचवल्या आहेत. त्यामध्ये लहान मुलं व वृद्ध यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.  आरोग्याची काळजी घेताना या काळात सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत. हलके खावे, फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न घ्यावे.. पुरेसे पाणी प्यावे. तहान नसली तरी दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची गरज आहे..गॉगल ,छत्री, टोपी, बूट, चप्पल घालूनच घराबाहेर पडावे. पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी. थंड पाण्याने आंघोळ करावी. घराबाहेरील  उपक्रमादरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारता वाढवावी आदी उपाययोजना हाती घेण्याचे मार्गदर्शन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उष्माघाताची लक्षणं - 

डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवा, व्यक्तीचे कपडे सैल करा.त्याला द्रव पदार्थ, कैरीचे पन्हे पाजा.

तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच कामे करा.

Web Title: Heat wave forecast in Thane district; Take care of health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.