काळीज पिळवटून टाकणारी घटना; होळी दहन करून येताना मामा-भाचे अपघातात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 17:05 IST2025-03-14T17:05:12+5:302025-03-14T17:05:47+5:30

वसईतील भारोळ येथील घटना.

Heartbreaking incident Uncle and niece killed in accident while returning from Holi burning | काळीज पिळवटून टाकणारी घटना; होळी दहन करून येताना मामा-भाचे अपघातात ठार

काळीज पिळवटून टाकणारी घटना; होळी दहन करून येताना मामा-भाचे अपघातात ठार

सुनील घरत, लोकमत न्यूज नेटवर्क, पारोळ : होळी दहन करून घरी येत असताना दुचाकी अपघातात मामा व भाचा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पारोळ येथे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. प्रल्हाद माळी (वय २५, रा. भिणार) व त्यांचा भाचा मनोज जोगारी (वय २०, रा. वरठापाडा, भिणार) अशी या मृत मामा-भाचे यांची नावे आहेत. हे होघेही एकाच गावातील असल्याने भिणार गावात होळीच्या उत्सवात शोककळा पसरली आहे.

प्रल्हाद व मनोज दोघे होळी दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ढेकाले येथे गेले होते. ते दुचाकीवरून परत येत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाले गावाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटून संरक्षक भिंतीला दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत या दोघांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या घटनेची नोंद मांडवी पोलिस ठाण्यात झाली असून या अपघाताचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Heartbreaking incident Uncle and niece killed in accident while returning from Holi burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.