विशाल हळदे
ठाणे/पडघा: मुंबई-नाशिक महामार्गावर आज पडघा गावाजवळ एका भीषण अपघाताचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगात असलेल्या एका अर्टिगा कारने चक्क तीन पलट्या मारत महामार्गाचा डिव्हायडर ओलांडून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर जाऊन आदळली. हा अपघात इतका विचित्र होता की उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब अर्टिगा कारने मुंबईहून नाशिकच्या दिशेने प्रवास करत होते. पडघा गावाजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार जोरात डिव्हायडरला धडकली. वेग जास्त असल्याने कारने हवेतच तीन पलट्या मारल्या आणि ती थेट विरुद्ध दिशेच्या (नाशिक-मुंबई) लेनवर जाऊन पडली.
देव तारी त्याला कोण मारी!अपघात भीषण असला तरी कारमधील एअरबॅग्ज आणि नशिबाची साथ यामुळे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Web Summary : A speeding car flipped three times on the Mumbai-Nashik highway near Padgha, crossing the divider. Passengers sustained minor injuries, but survived due to airbags and luck. Traffic was briefly disrupted.
Web Summary : मुंबई-नासिक हाईवे पर पडघा के पास एक तेज रफ्तार कार तीन बार पलटी, डिवाइडर पार कर गई। यात्रियों को मामूली चोटें आईं, लेकिन एयरबैग और किस्मत से बच गए। यातायात बाधित हुआ।