शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

हजरत हुसेन यांच्या वीरमरणाच्या स्मृतीचा दिवस

By admin | Updated: October 13, 2016 03:25 IST

इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे इस्लामीक चळवळीचे एक ऐतिहासिक युध्द झाले.ज्याने इस्लाम धर्माचा

जव्हार : इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे इस्लामीक चळवळीचे एक ऐतिहासिक युध्द झाले.ज्याने इस्लाम धर्माचा चेहरामोहराच बदलून टाकला. हिजरी संवतचा (इस्लामिक वर्ष ) पहिला महिना म्हणजे मोहरम ! मोहरमच्या १० तारखेला (१० मुहर्रम ६१ हिजरी, अर्थात इ.स.६८० मध्ये) मोहम्मद पैगंबर साहेब यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे खलिफा यजीद बिन मुआविया यांच्या साथीदारानी ज्या दिवशी युद्धात मारले होते. तो दिवस म्हणजे यौमे आशुरा होय. याच दिवशी हजरत हुसैन यांच्या वीरमरणाच्या स्मृतीमध्ये मुस्लिम बांधव मोहरम साजरा करतात.करबलामध्ये एका बाजूला हजरत हुसेन यांच्यासोबत केवळ ७२ तर दूसरया बाजुला यजिद यांचे तब्बल ४० हजार सैनिक होते.७२ जणांमध्ये महिला-पुरूष व ५१ मुलांचा समावेश होता. हजरत हुसैन यांच्या फौजेमध्ये अनेक लहान मुले होती. अशा परिस्थितीही ते युध्दास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यांच्या सैन्याचे प्रमुख होते. दुसऱ्या बाजुला यजिद यांच्या सैन्याची कमान उमर इब्ने सईद यांच्या हातात होती. युध्दाचे कारण -इस्लाम धर्माचे पाचवे खलिफा अमीर मुआविया यांनी खलिफाच्या निवडणुकीत समाजाच्या विरोधात जाऊन त्यांचा मुलगा यजिदला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. यजीद हा त्या काळी गुंड म्हणून प्रसिध्द होता. त्यामुळे मुस्लिमांना तो खलिफा झाल्याचे रूचले नाही.यजिदने समाजाविरूध्द बंड केले पण यजिद समोर मोहम्मद पैगंबर यांच्या परिवारातील हजरत हुसेन यांचे आवाहन होते कारण ते यजिदसमोर झुकण्यास तय्यार नव्हते. यजिदने हजरत हुसैन यांनी त्याला खलिफा पदासाठी मान्य करण्यासाठी दम दिला.इमाम हुसैन यांनी यजीदला खलिफा म्हणून मान्य न केल्याने करबला या गावावर युद्धाचे ढग गोळा झाले. हजरत हुसेन यांनी आपले मोठे बंधु इमाम हसन यांच्यासोबत आपल्या परिवारातील लहान मुले व महिलांसह यजिदशी युद्ध केले. यात हजरत हुसेन यांच्या परिवारातील सर्वजण शहिद झाले. पण पराक्रमी योद्धा असलेल्या हुसेन यांचा ते पराभव करु शकले नाही. युद्धभुमीवर सायंकाळची (असरची) नमाज अदा करत असताना जेव्हा हजरत हुसैन हे सजदा मध्ये गेले (सजदा-माथा टेकून नमाज मध्ये झुकणे) तेव्हा यजीदच्या सैन्याने हिच संधी मानून हजरत हुसैन यांच्या पाठीत धोक्याने वार केला.त्यात हजरत हुसैन शहीद झाले. त्यामुळेच हजरत हुसैन यांना शहीद-ए-आजम म्हटले जाते.