Hathras Gangrape : हाथरस पीडितेचा झाला होता साखरपुडा, लॉकडाऊनमुळे पुढे ढकलले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 01:31 AM2020-10-03T01:31:37+5:302020-10-03T01:31:48+5:30

Hathras Gangrape : चुलत भावाने दिली माहिती : लॉकडाऊनमुळे लग्न ढकलले होते पुढे

Hathras victim had a sugar crash, marriage postponed due to lockdown | Hathras Gangrape : हाथरस पीडितेचा झाला होता साखरपुडा, लॉकडाऊनमुळे पुढे ढकलले लग्न

Hathras Gangrape : हाथरस पीडितेचा झाला होता साखरपुडा, लॉकडाऊनमुळे पुढे ढकलले लग्न

Next

मुरलीधर भवार ।

कल्याण : माझ्या चुलत बहिणीचा साखरपुडा झाला होता. लॉकडाऊनमुळे लग्न लांबले. मात्र हाथरसमधील जातीव्यवस्था आणि शोषणव्यवस्थेने तिचा बळी घेतला, अशा शब्दांत हाथरसमधील पीडित तरुणीच्या उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या चुलत भावाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
हाथरस येथील पीडित तरुणीचे चुलत भाऊ उल्हासनगरातील धोबीघाट परिसरात राहतात. ते खाजगी वाहन चालक आहेत. पोटापाण्यानिमित्त त्यांचे येथे वास्तव्य आहे. हाथरस येथे त्यांचा चुलता-चुलती राहतात. त्यांना तीन मुली आहेत. त्यापैकी एका मुलीचे लग्न झालेले आहे. दुसरी मुलगी अविवाहित आहे. पीडित तरुणी सगळ्यात लहान मुलगी होती. तिचे लग्न ठरले होते. तिचा साखरपुडा पार पडला होता. कोरोनामुळे तिचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. जर तिचे लग्न झालेले असते तर कदाचित हा प्रकार घडला नसता, अशी भावना तिच्या चुलत भावाने व्यक्त केली.

माझी ही बहीण शेतात काम करीत होती. आई-वडिलांना हातभार लावत होती. त्या दिवशी शेतात काम करीत असताना अंध जातीव्यवस्थेमुळे मस्तवाल झालेल्यांनी तिला एकटे गाठून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तिला जीवे ठार मारण्याच्या हेतूने जखमी केले. ही घटना मला १४ सप्टेंबरच्या रात्रीच माझ्या चुलतीने फोनवरून सांगितली. सहा दिवसांनंतर या घटनेची सविस्तर बातमी टीव्ही चॅनलवर पाहिली तेव्हा मला सर्व घटना कळली आणि अक्षरश: रडू कोसळले.

पीडित बहीण फारशी शिकलेली नव्हती. गावात आई-वडिलांना शेती व पशुपालनात हातभार लावत होती. गावात वाल्मीकी समाजाची तीनच घरे आहेत. गावात जातीयवाद भयंकर आहे. ठाकूर समाजाकडून मागासवर्गाला तुच्छतेची वागणूक देण्यात येते. त्यामुळे मागास समाज ठाकूर समाजाला कायम भिऊन जगतो. ठाकूर समाजाची टवाळ, मस्तवाल पोरे मागासवर्गीय समाजाच्या मुलींची छेड काढणे, त्यांचा विनयभंग करणे हे प्रकार सर्रास करतात. ज्या तरुणांनी माझ्या पीडित बहिणीवर बलात्कार करून तिला बेदम मारहाण केली त्याच टोळक्याने तिला एकदा शेतात गाठून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिच्या आईला तिच्या प्रतिकाराचा आवाज येताच अतिप्रसंग करणाऱ्यांनी धूम ठोकली होती.
हाच राग धरून त्या तरुणांनी तिला १४ सप्टेंबर रोजी शेतात गाठून तिच्यावर पाशवी बलात्कार केला, हे सांगताना तरुणीच्या चुलत भावाचे डोळे डबडबले. कोरोनामुळे गावी जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, गावात बाहेरून येणाºयाला प्रवेश नाही. माझ्या बहिणीच्या मारेकºयांना कठोर शिक्षा दिली जावी, अशी माझी मागणी आहे.

‘घटनेची सीबीआय चौकशी करावी’
मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाºयांना कठोर शिक्षा व्हावी. तिचा अंत्यविधी घाईगर्दीत उरकणाºयांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख संदीप गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Hathras victim had a sugar crash, marriage postponed due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.