हार्बर रेल्वे पुन्हा विस्कळीत, पनवेल -सीएसएमटी मार्ग झाला बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 13:57 IST2017-12-30T13:52:28+5:302017-12-30T13:57:38+5:30
हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ अद्यापही संपलेले नसून शनिवारी दुपारी हार्बरमार्गावर जुईनगर जवळ बिघाड झाल्याने वाशी-पनवेल सेवा ठप्प झाली आहे.

हार्बर रेल्वे पुन्हा विस्कळीत, पनवेल -सीएसएमटी मार्ग झाला बंद
नवी मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ अद्यापही संपलेले नसून शनिवारी दुपारी हार्बरमार्गावर जुईनगर जवळ बिघाड झाल्याने पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. जुईनगरजवळच्या क्रॉसिंग पॉईंटवर बिघाड झाला आहे.
पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी 12:41 ची लोकल ब-याच वेळापासून खारघर आणि बेलापूर स्थानका दरम्यान थांबून असल्याने अखेर लोकांनी ट्रॅक वरून चालत जाण्याचा मार्ग स्वीकारला. सीएसएमटीकडून पनवेलला जाणारी वाहतूक सुरु आहे.