भिवंडीत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: April 20, 2023 18:09 IST2023-04-20T18:08:43+5:302023-04-20T18:09:13+5:30

विवाहितेच्या वडिलांनी लग्नात हुंडा कमी दिला म्हणून पत्नीला पतीसह सासरच्या मंडळीकडून सतत मारहाण असल्याचे समोर आले. 

Harassment of married women in Bhiwandi; A case has been filed against seven people including the husband and father-in-law | भिवंडीत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडीत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी- विवाहितेच्या वडिलांनी लग्नात हुंडा कमी दिला म्हणून पत्नीला पतीसह सासरच्या मंडळीकडून सतत मारहाण असल्याचे समोर आले. यातच पतीने दुसरे लग्न केल्याने विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून पतीसह सासरच्या एकूण सात जणांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

 शबिना दानिश शेख वय वय २९ वर्ष राहणार विठ्ठल नगर, नारपोली असे छळ झालेल्या विवाहितेचे नाव असून तिचा विवाह २८ जानेवारी २०१९ रोजी दानिश इब्राहिम शेख याच्यासोबत झाला होता. मात्र लग्नात शबीना तिच्या वडिलांनी हुंडा कमी दिला म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी शबीना हिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

त्यानंतर पती दानिश याने शबीना हीस शिवीगाळ व मारहाण करून तिच्याशी कोणत्याही प्रकारची फारकत अथवा घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले केल्याची बाब शबीना हीस समजली असता आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात शबीना हिने भोईवाडा पोलीस ठाणे गाठून पती दानिश इब्राहिम शेख याच्यासह सासरे इब्राहिम शेख सासू अबेदा इब्राहिम शेख व पतीच्या घरातील मुस्तफा इब्राहिम शेख , सिमरन इब्राहिम शेख जाऊबाई मरियम मुस्तफा शेख, मामे सासरे अश्रफ मुस्तफा शेख अशा सात जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Harassment of married women in Bhiwandi; A case has been filed against seven people including the husband and father-in-law