शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

अल्पदराने दीड लाख लिटर दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:03 IST

मुंबईसह जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात ग्रामीण भागातून गायी, म्हशीच्या सुमारे एक लाख ६० हजार लिटर ताज्या दुधाचा पुरवठा होत आहे

ठाणे : मुंबईसह जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात ग्रामीण भागातून गायी, म्हशीच्या सुमारे एक लाख ६० हजार लिटर ताज्या दुधाचा पुरवठा होत आहे. मात्र, यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाºया अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी तालुक्यातील शेतकºयांना अवघा ४० ते ५० रूपये अल्प दर मिळत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.मुंबई, ठाणे परिसरातील दुधांची गरज पूर्ण करण्यासाठी राज्यातील अन्य जिल्ह्यांसह गुजरात राज्यातून मोठ्याप्रमाणात येत आहे. मात्र या दुधाची गरज पूर्ण करण्याची क्षमता मुंबईचे प्रवेशव्दार असलेल्या ठाणे जिल्ह्यात आहे. त्याकडे लक्ष केंद्रीत करून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून तांदूळ उत्पादनासह भाजीपाल्यात गुंतलेल्या शेतकºयांना दुग्ध उत्पादनाकडे वळवण्याची काळाची गरज आहे. दुग्ध उत्पादनासह संकलन क्षमता असल्यामुळे जिल्ह्यात विविध कंपन्या पाय पसरवित आहेत. प्रारंभी या कंपन्यांनी फॅट (स्निग्धता) न लावता शेतकºयांकडून दूध संकलीत केले. आता मात्र फॅट लावून दूध घेत असल्याचे वास्तव उघडकीस आले. यास शासनाच्या पशुसंवर्धन विभागानेदेखील दुजोरा दिला.सुमारे सात ते आठ फॅटच्या दुधास या कंपन्यांकडून मागणी आहे. परंतु, या स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकरी कमी पडत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन अवघ्या ४० ते ५० रूपये लिटर दराने त्यांच्याकडून दूध घेत असल्याचे मुरबाडमधील शेतकºयांकडून सांगितले जात आहे.जिल्ह्यात पावसाळ्यानंतर फारसा हिरवा चारा, गवत तेथील गायी, म्हशीना मिळत नाही. दर्जेदार पशूखाद्याची मागणी नसल्यामुळे ७ ते ८ फॅटचे दूध मिळत नाही. केवळ ६ फॅटच्या दुधाचे उत्पादन जिल्ह्यात मिळत आहे. दुधाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील माळरानाचा चांगला उपयोग करणे शक्य होईल. त्यासाठी सहकार क्षेत्रातून दूध डेअरीची स्थापना होणे अपेक्षित असल्याचे टीडीसीसी बँकेच्या पशूधन विभागाचे डॉ. प्रकाश भोंडीवले यांनी लोकमतला सांगितले.टीडीसीसी बँकेकडे ज्या सोसायट्या आहेत. त्या केवळ मतदाना पुरत्या असल्याचा आरोपही बांगर यांनी केला. मात्र, टीडीसीसी बँकेने हा आरोप खोडून जिल्ह्यातील शेतकºयांना दुग्ध उत्पादनासाठी दहा कोटी ५८ लाखांचे कर्ज म्हशींच्या खरेदीसाठी दिल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर दुग्ध उद्योजक विकास योजनेअंतर्गत ७६६ सभासदांना सहा कोटी ४० लाख ५५ हजार रूपये अनुदान तत्त्वावर दिले आहेत.२८ फेब्रुवारीपर्यंत या योजनेव्दारे शेतकºयाना प्रस्ताव सादर करता येणार आहे. या योजनेव्दारे आतापर्यंत ८७५ सभासदाना आठ कोटी १३ लाख रकमेचे क्लेम मंजूर आहेत . त्यातून सहा कोटी ४० लाख ५५ हजार रूपये अनुदान प्राप्त झाले आहेत. उर्वरित १०९ सभासदांंंचे एक कोटी ७२ लाखांचे क्लेम प्रलंबित असल्याचा दावा टीडीसीसी बँकेने केला आहे.दुग्ध उत्पादनास वावजिल्ह्यात सद्यस्थितीला दोन लाख गायी, म्हशी आदी जनावरे आहेत. त्यातील काही भाकड गायी, म्हशी वगळता सुमारे १० ते १५ हजार दुभत्या गायी म्हशी असल्याचा अंंदाज आहे. त्याव्दारे एक लाख ६० हजार लिटर दूधाचे ग्रामीण भागात उत्पादन होत आहे. मात्र, त्या मोबदल्यात शेतकºयांना फारसा आर्थिक लाभ होत नसल्याची खंत मुरबाड येथील बांगर या दुग्ध व्यवसाय शेतकºयांने व्यक्त केली.पंतप्रधानांच्या पुढाकाराने ‘अमुल’चा शिरकावमुंबईला ३० हजार लिटर दुधाचा पुरवठा करणाºया अमुल कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने शेतकºयांच्या प्रयत्नातून ठाणे जिल्ह्यात प्रवेश केला आहे. शहापूर, मुरबाड परिसरात त्यांची यंत्रणा कार्यरत आहे. जिल्ह्यातील दूध अमूलने घ्यावे म्हणून शेतकºयांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर अमुलने जिल्ह्यात हातपाय पसरले आहेत.भिवंडीच्या गोवे येथे मदर डेअरीचा लवकरच प्रकल्पशासनाच्या प्रयत्नाने मदर डेअरी फ्रु ट अ‍ॅन्ड व्हिजिटेबल या कंपनीने भिवंडीजवळील गोवे येथे सात हेक्टरमध्ये कंपनी उभारण्याची तयारी सुरू केली आहे. सुमारे पाच लाख लिटर दूध ही कंपनी दिवसाला संकलीत करणार आहे. या कंपनीला दुग्ध विकास विभागाने जागा देऊन कंपनी उभारण्यास सहमती दिली आहे. या कंपन्याबरोबर शेतकºयांचे हित सांभाळणाºया सहकार क्षेत्रातून अन्य जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन शेतकºयांसाठी डेअरी स्थापनेची शेतकºयांची मागणी आहे. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त होते.