कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 18:18 IST2018-10-15T18:13:40+5:302018-10-15T18:18:55+5:30

अलगम्मा राहत असलेली मेट्रो सोसायटी ही मेट्रो मॉलच्या नजीक आहे. अलगम्मा या सोसायटी परिसरातील रस्त्यावर मॉर्निग वॉक करीत होत्या. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास भटक्या कु्त्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. चार पाच कुत्रे त्यांच्या दिशेने धावऊन आले.

Hades in Kalyan; Wounded female wounded in wartime dogs | कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी

कल्याण - शहराच्या पूर्व भागातील हाय प्रोफाईल असलेल्या मेट्रा सोसायटीत राहणाऱ्या 68 वर्षी अगलम्मा कोनार या मॉर्निग वॉक करीत असताना भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात अलगम्मा या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अलगम्मा राहत असलेली मेट्रो सोसायटी ही मेट्रो मॉलच्या नजीक आहे. अलगम्मा या सोसायटी परिसरातील रस्त्यावर मॉर्निग वॉक करीत होत्या. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास भटक्या कु्त्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. चार पाच कुत्रे त्यांच्या दिशेने धावऊन आले. त्यांच्या हाताला, पायाला विविध ठिकाणी चावे घेतले. या घटनेने अलगम्मा या भयभीत झाल्या. त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.  हा प्रकार कळताच अन्य नागरीकांनी अलगम्मा यांच्या दिशेने धाव घेतली तेव्हा कुत्र्यांनी पळ काढला. अलगम्मा यांच्या मुलाने अलगम्मा यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

आज अलगम्मा यांना कुत्र चावल्याची घटना घडली. मात्र, महिनाभरात मलंग रोड व चक्कीनाका परिसरात एका पाच वर्षाच्या मुलीस व एका महिलेस भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती. डोंबिवलीतही भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मुलगी जखमी झाली होती. कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरातील एकाला त्याच्याच घरातील पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला होता. महापालिका हद्दीत विविध ठिकाणी कचरा उचलला जात नाही. या कचऱ्यात उष्टे अन्न टाकले जाते. त्यामुळे कचऱ्यात टाकले जाणाऱ्या अन्नावर जगणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. वेळीच कचरा उचलला तर कचऱ्याच्या ठिकाणी असलेला कुत्र्यांचा वावर कमी होईल. भटक्या कुत्र्यांची पैदास रोखण्यासाठी महापालिकेकडून श्वान निर्बिजीकरणाचा प्रकल्प चालविला जातो. त्याद्वारे योग्य व प्रभावी काम होत नसल्याने भटक्या कुत्र्यांकडून नागरीकांना होणारा उपद्रव व त्यांची दहशत कायम आहे. महापालिकेने श्वान निर्बिजीकरणाचा ठेका दिला असला तरी त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम केले जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनोज नायर यांनी केला आहे. श्वान निर्बिजीकरण प्रकल्पाच्या कामाचे थर्ड पार्टी लेखा परिक्षण करावे अशी मागणी केली आहे.

Web Title: Hades in Kalyan; Wounded female wounded in wartime dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.