Hacking an Instagram account and sending pornographic images to young girls | इन्स्टाग्रामचे अकाउंट हॅक करून तरुणींना अश्लील फोटो पाठवणारा जेरबंद

इन्स्टाग्रामचे अकाउंट हॅक करून तरुणींना अश्लील फोटो पाठवणारा जेरबंद

ठळक मुद्देविनयभंगाचा गुन्हा दाखल

ठाणे : इन्स्टाग्रामचे अकाउंट हॅक करून तरुणींना अश्लील फोटो आणि मेसेज पाठवणा-या रायगड जिल्ह्यातील डोलवली (ता. खालापूर) येथील यश चोरगे (१९) या आरोपीला ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी कळव्यातून अटक केली. त्याला २८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
नौपाडा भागातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन पीडित तरुणीचे इन्स्टाग्रामचे अकाउंट यशने हॅक केले होते. त्याद्वारे तो त्याच्या अकाउंटवर अश्लील फोटो पोस्ट करत होता. तसेच अश्लील व्हिडीओदेखील अपलोड करून त्याने तिचा विनयभंग केला. याला कंटाळून तिने हा प्रकार पालकांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार, याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. याची गंभीर दखल घेत ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर आणि राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबींच्या मदतीने गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने चोरगेला २३ आॅगस्ट २०१९ रोजी अटक केली. त्याचे लोकेशन रायगड येथील डोलवली गावात असल्याची माहिती मिळाल्यामुळे नौपाडा पोलीस त्या गावात पोहोचले. परंतु, तो ठाण्याच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून पाठलाग करून कळवानाका येथून त्यास ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस निरीक्षक शेरेकर याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. त्याने आणखी किती तरुणींचे इन्स्टाग्रामवरील अकाउंट हॅक करून असे विनयभंगाचे प्रकार केलेत, याबाबतचा तपास करण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच पोक्सो कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
........................

Web Title: Hacking an Instagram account and sending pornographic images to young girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.